परीक्षेशिवाय इंटर्नशीपला केंद्रीय वैद्यकीय परिषदेचा नकार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

परीक्षेशिवाय इंटर्नशीपला केंद्रीय वैद्यकीय परिषदेचा नकार

कोरोनाच्या काळात राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार काही परीक्षा रद्द केल्या, तर काही परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. परिक्षेशिवाय प्रशिक्षण सुरू करण्यास भारतीय वैद्यकीय परिषदेने नकार दिला आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्छ उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर परीक्षा घेण्यात याव्यात अशी राज्य सरकारची भूमिका होती. त्यानुसार गेल्याच आठवडय़ात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला तशा सूचना दिल्या होत्या.

शेवटच्या वर्षाच्या शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणात अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण काळ सुरू करावा आणि कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर परीक्षा घेतल्या जातील असे ठरविण्यात आले होते, आणि यासाठी भारतीय वैद्यकीय परिषदेकडे परवानगी मागितली होती. परंतु भारतीय वैद्यकीय परिषदेने परवानगीला नकार दिला अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी माहिती दिली. या प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी होणार असल्याने शिक्षणक्षेत्राचे आणि विद्यार्थ्यांचे लक्ष सुनावणीकडे लागले आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्य सरकार न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News