आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या केंद्र सरकारच्या योजना म्हणजे निव्वळ ढोंगीपणा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020

आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या केंद्र सरकारच्या योजना म्हणजे निव्वळ ढोंगीपणा

आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या केंद्र सरकारच्या योजना म्हणजे निव्वळ ढोंगीपणा

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरूवारी एका याचिकेवर सुनावनी सुरू असताना केंद्र सरकारला चांगलेचं फटकारले आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या केंद्र सरकारच्या योजना म्हणजे निव्वळ ढोंगीपणा असल्याचे सांगितले. विमानतळांबाबतच्या टेंडर विषयी एक याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावेळी न्यायालयाकडून हे वक्तव्य केल्याचं वृत्त फायनॅन्शियल एक्सप्रेसने दिले आहे.

उच्च न्यायालयाने तुम्हाला छोटे व्यवसाय बंद करायचे आहेत का ? तसं असेल तर ते स्पष्ट करा. तुमच्या भाषणांमध्ये उगाच ढोंगीपणा दाखवू नका. त्यात तुमचे राजकीय नेते मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत विषयी नेहमी बोलत असतात. त्याचबरोबर ते आपल्या भाषणात स्थानिक व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने बोलत असतात. राजकीय नेत्यांची कृती भाषणाशी संबंधित नसते. केंद्र सरकार पुर्णपणे ढोगी पणाने वागत आहे अशा शब्दात न्यायमुर्ती विपीन सांघी व न्यायमुर्ती रजनीस भटनागर यांनी केंद्र सरकारला फटकारले.

त्याचबरोबर तुम्हाला मोठ्या कंपन्या हव्या आहेत, त्याची उलाढाल सुध्दा मोठी असते. त्या कंपनीचा संबंध परदेशाशी आहे. केंद्र सरकारला जर छोट्या कंपन्या जर बंद करायच्या असतील, तर त्यांनी तसं स्पष्ट करावं. मेक इन इ इंडियाच्या गोष्टी भाषणात करू नये. कारण आम्हाला हे सर्व पाहून वाट वाटतंय. असे न्यायालयाने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News