केंद्र सरकारचे नियोजन ढिसाळ आहे; परीक्षा पुढे ढकलण्याची राज्यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020

केंद्र सरकारचे नियोजन ढिसाळ आहे; परीक्षा पुढे ढकलण्याची राज्यांची मागणी

केंद्र सरकारचे नियोजन ढिसाळ आहे; परीक्षा पुढे ढकलण्याची राज्यांची मागणी

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्यामुळे अनेक राज्य चिंतेत आहेत. त्यातचं २५ लाख विद्यार्थी नीट आणि जेईईची परीक्षा देणार आहेत. अशा अवस्थेत परीक्षा घेणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळल्यासारखं आहे, असं अनेक राज्यांचं मत आहे. परीक्षा स्थगित करण्यात याव्यात अशी  मागणाी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, झारखंड, छत्तीसगढ आणि पुद्दुचेरी राज्यांनी केली आहे. परीक्षेचे नियोजन नसल्याने गोंधळ उडेल, विद्यार्थ्यांचे आरोग्य संकटात येईल असा दावा काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आला.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, झारखंड, छत्तीसगढ आणि पुद्दुचेरी राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात नीट आणि जेईईच्या परीक्षा स्थगित करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील नेते डेरेक ओब्रायन आणि काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी परीक्षेचा मुद्दा हा विद्यार्थ्यांचा आहे, तसेच यात राजकारण अजिबात नाही, परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, तसेच विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यावरती तोडगा काढावा अशी सर्वानुमते करण्यात आली.

विशेष म्हणजे पुनर्विचार याचिका दाखल करणा-या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, झारखंड, छत्तीसगढ आणि पुद्दुचेरी या राज्यांकडे देशाचे ३० टक्के क्षेत्रफळ आहे, तसेच ३० टक्के लोकसंख्या सुध्दा आहे. या परीक्षा अधिक घाईने घेतल्यास विद्यार्थ्यांसह पालकांनाही त्याची झळ बसू शकते. सध्याच्या केंद्र सरकारचे नियोजन ढिसाळ आहे. चार तासांच्या पूर्वसूचनेवर देशात लॉकडाऊन जाहीर करणाऱ्या सरकारकडून आणखी वेगळी अपेक्षा करता येणार नाही, अशी टीका ओब्रायन यांनी केली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News