केंद्र सरकारने परीक्षेचा फेरविचार करावा; नाही तर... :अशोकराव चव्हाण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020

या मोहीमेअंतर्गत काँग्रेसचे पदाधिकारी एका व्हिडिओद्वारे व्यक्त होत आहेत. परीक्षा स्थगित करण्यासाठी संपूर्ण देशभर काँग्रेसने आंदोलन सुरू केले.

मुंबई : नीट परीक्षा संदर्भात विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केल्यानंतर आता काँग्रेसने रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली. या दोन्ही परीक्षा स्थगित कराव्या यासाठी सोशल मीडियावर 'स्पीक अप फॉर स्टुडंट सेफ्टी' ऑनलाईन मोहीम काँग्रेसने सुरू केली. या मोहीमेअंतर्गत काँग्रेसचे पदाधिकारी एका व्हिडिओद्वारे व्यक्त होत आहेत. परीक्षा स्थगित करण्यासाठी संपूर्ण देशभर काँग्रेसने आंदोलन सुरू केले. या आंदोलनावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

सरकारने घेतलेला निर्णय हा अयोग्य आहे, विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्या असे आम्हाला वाटते मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतोय अशा परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे योग्य नाही, केंद्र सरकारने परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, नाहीत आंदोनल अधिक तिव्र करु असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

देशामध्ये रेल्वे आणि विमान सेवा या पूर्वपदावर आलेल्या नाहीत, अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जायचं कसं? असा प्रश्न खासदार राजीव सातव यांनी उपस्थित केला. देशांमध्ये सार्वजनिक दळणवळण व्यवस्था ठप्प आहे अशा परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य नाही. संरक्षण समितीचा सदस्य आहे. सहा महिन्यापासून संरक्षण समितीची एकही बैठक झाली नाही अशा महत्वपूर्ण बैठक सरकारने रद्द केल्या असा घणाघाती आरोप खासदार सातव यांनी केंद्र सरकारवर केला. कोरोना काळात सरकार विद्यार्थ्यांचे परीक्षा आयोजन करण्याचे काम करत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन सरकराने परीक्षा स्थगीक कराव्या अशी मागणी सातव यांनी केंद्र सरकारकडे केली. यावर काही विद्यार्थी संघटनांनी काँग्रेसला समर्थन दिले. विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नावरून कॉग्रेंस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या हातांमध्ये परीक्षेच आयते कोलीत मिळाले आहे त्यामुळे आता कॉग्रेस कुठे- कुठे आग लागवेल हे भविष्यात कळेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News