केंद्राला सुध्दा अंतिम वर्षाच्या परीक्षा हव्यात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात असं महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारचं म्हणणं आहे. परंतु हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नसून तो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करणारा असेल अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञाद्वारे मांडली

केंद्राला सुध्दा अंतिम वर्षाच्या परीक्षा हव्यात

कोरोनाच्या काळात परीक्षा होणार की नाही, हे अजूनही निश्चित झालेलं नाही. पण अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या युजीसीच्या निर्णयाला केंद्र सरकारने पाठींबा दिला आहे. भारतातल्या सर्व विद्यापीठांना परीक्षा घेण्याची अनुमती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात देण्यात आली. या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे.

युजीसीने ६ जुलैला मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या होत्या. विशेष म्हणजे युजीसीने परीक्षा ऑफलाइन, ऑनलाइन आणि संमिश्र पध्दतीने घेण्याची मुभा सु्ध्दा दिली होती. तसेच घेण्यात येणा-या परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत पुर्ण कराव्यात असंही स्पष्ट केलं होतं.

याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रालाही आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यावर केंद्राने आपली भूमिका मांडताना विद्यापीठ अनुदान आयोगाचे समर्थन केले आहे. तसेच याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी सुध्दा चर्चा केली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ३१ ऑगस्टपर्यंत शैक्षणिक संस्था बंद असल्यातरी त्यातून अंतिम वर्षांच्या परीक्षा व मूल्यमापनासाठी त्यांना निर्बंधातून सूट देण्यात आल्याचे गृहमंत्रालयाने न्यायालयात सांगितले.

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात असं महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारचं म्हणणं आहे. परंतु हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नसून तो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करणारा असेल अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञाद्वारे मांडली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News