गर्लफ्रेंडसोबत साजरा करत होता valentine; पत्नीने बघितलं आणि पोलिसांसमोरच...

यिनबझ टीम
Monday, 17 February 2020

रस्त्यावरील गोंधळ पाहून पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तरीही पत्नीचा राग शांत झाला नाही, पत्नीने पोलिसांसमोर आपल्या पतीचे काळे धंदे सांगायला सुरूवात केले.

पटना : १४ फेब्रुवारीला सर्व तरुण मंडळी व्हॅलेन्टाईन्स डे साजरा करण्यासाठी पटनाच्या पार्कमध्ये फिरत होते. आपल्या पतीवर संशय असलेली एक महिलादेखील तिथे उपस्थित होती. अशातच एक तरुण आपल्या मैत्रिणीला घेऊन व्हॅलेन्टाईन्स डे साजरा करण्यासाठी तिथे पोहोचला. आपल्या पतीला दुसऱ्या तरुणीसोबत बघताच संबंधीत महिलेने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. ही सर्व घटना पटनातील सचिवालय पोलीस स्टेशन परिसरात घडल्याने पोलिसांनीही तिथे हजेरी लावली.

पोलीस घटना स्थळी येताच संबंधीत महिलेने आपल्या पतीची सगळी कारस्थाने त्यांना सांगायला सुरूवात केली आणि पतीला लवकरात लवकर ताब्यात घेण्याची विनंतीदेखील करू लागली. भर रस्त्यातच एका पुरुषामुळे दोन महिलांमध्ये सुरू असलेले भांडण पाहाण्यासाठी मोठी गर्दीही जमली होती, मात्र गर्दीला दूर करत पोलिसांनी त्या तिघांनाही पोलीस चौकीत नेले आणि समजूत काढूल तिघांनाही घऱी पाठवले.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार 3 वर्षांपुर्वीच संबंधीत तरुणाशी तिचा प्रेमविवाह झाला होता आणि एक लहान मुलदेखील त्यांना आहे. गेले काही दिवस पतीचे घराकडे दुर्लक्ष होत असल्याचे तिला समजले आणि तिने पतीचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. व्हॅलेन्टाईन्स डे दिवशी आपल्या मैत्रिणीला तो नक्की या पार्कमध्ये घेऊन येणार, हे तिला माहित असल्याने तिने नवऱ्याच्या आगोदर तिथे हजेरी लावली आणि नवऱ्याला रंगेहात पकडले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News