शिवाजी विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

अखिल मुंडले पवनी
Friday, 28 February 2020

श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय पवनी येथे आज (ता. २८) ' राष्ट्रीय विज्ञान दिवस' साजरा करण्यात आला.

पवनी : श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय पवनी येथे आज (ता. २८) ' राष्ट्रीय विज्ञान दिवस' साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक डाॅ.पंजाबराव भाऊसाहेब उपाख्य देशमुख व रमन प्रभावाच्या शोध लावणारे थोर भारतीय भौतिकशास्त्रज्ञ भारतरत्न चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. विजय लेपसे यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. प्रमुख अतिथी म्हणून प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. किशोर नगरनाईक, डाॅ.घुगल, रसायनशास्र विभाग प्रमुख डाॅ. घरडे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावेळी डाॅ.लेपसे यांनी विज्ञान दिवसा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. रमन प्रभाव यांवर विद्यार्थ्यांनी पॉवरपॉइंट सादरीकरणच्या माध्यमातुन सेमिनार दिले तर काहींनी पोस्टर डिझायनिंग करून दाखवली. 
       

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News