आधार अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात शिवाजी महाराजांची जयंती साजरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 February 2020

मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित 'आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन' केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली.

उदगीर: मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित 'आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन' केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे संचालक सदस्य अक्षयभैया सोलापुरे, आधार अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राचे व्यवस्थापन परिषद सदस्य अतुल कुंटे रेड्डी, शिवसेना तालुका उपप्रमुख अंकुशभैया ताटपल्ले, किशोर राठोड यांच्यासह मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संचालक श्रीकांत जाधव उपस्थित होते.
              

भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे संचालक सदस्य अक्षयभैया सोलापुरे म्हणाले की, 'जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राचा लाभ घ्यावा.' अभ्यासिकेतून अधिकारी नक्कीच घडतील असा विश्वास व्यक्त केला आणि आधाच्या उपक्रमाचे कौतुक केले.  

आधार केंद्राचे सदस्य अतुल कुंटे रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्यासाठी बांधील राहू असे नमूद केले. तसेच शिवसेना तालुका उपप्रमुख अंकुश ताटपल्ले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या व यापुढील काळात अभ्यासिकेला लागेल ती मदत देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी अभ्यासिकेचे विद्यार्थी कृष्णा जाधव, बालाजी राठोड, अजय राठोड, ऋषीकेश दहिफळे, आकाश सोनटक्के, दयानंद सोनटक्के, जय वाघमारे, रहीम कुरेशी, गणेश सोनटक्के, गणेश आयणले आदी उपस्थित होते.

अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे प्रंचड बुद्धीमता असते मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे कोचिंग क्लासेसची फी भरुन मार्गदर्शन घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी मोफक आधार स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्राची स्थापन केली आहे. अभ्यासिकेला आर्थिक पाठळाची गरज आहे समाजातील दानशूर जनतेने सढळ हाताने मदत करावी असे आवाहन अतुल कुंटे रेड्डी यांनी केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News