स्वकर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करावे ; तेजश्री प्रधान 

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Friday, 17 January 2020
  • स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या पप्रामाणिक प्रयत्नांना कष्टाची जोड द्या.
  • यश स्वतःहून तुम्हाला गवसणी घालेल असे परखड मत मराठी मालिकांमधील आघडीची अभेनेत्री तसेच आपली सर्वांची लाडकी नाट्य कलाकार तेजश्री प्रधान हिने व्यक्त केले.

मुंबई :स्वतःच्या हिंमतीवर आजूबाजूचे वलय निर्माण करावे तसेच स्वतःचे कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पडावे. स्वतःच्या प्रामाणिक कर्तृत्वावर विश्वास ठेवावा आणि स्वतःचा उत्कर्ष साधा. कधीही दुसऱ्याच्या पावलावर पाऊल ठेऊ नका.स्वतःची शैली निर्माण करा.

स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या पप्रामाणिक प्रयत्नांना कष्टाची जोड द्या. यश स्वतःहून तुम्हाला गवसणी घालेल असे परखड मत मराठी मालिकांमधील आघडीची अभेनेत्री तसेच आपली सर्वांची लाडकी नाट्य कलाकार तेजश्री प्रधान हिने व्यक्त केले. तेजश्रीने नुकतेच आपले मत एका आयोजित व्याख्यानमालेत केले तसेच इंग्रजीचा अतिरेकी वापर मराठी संस्कृतीसाठी मारक ठरतोय त्यामुळे मराठीची संस्कृतीची प्रचंड प्रमाणावर मुस्कटदाबी होत आहे.

मराठी भाषेच अज्ञान हे सर्वात मोठे आवाहन आपल्या समोर असल्याचे मत तिने व्यक्त केले. तसेच ह्यामुळे मराठी भाषेचे होणारे नुकसान हा चिंतेचा विषय आहे. सध्याच्या युगातील डिजिटलायजेशनचे वाढते प्रस्थ हे वाचनसंस्कृतीचा अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे आजकालच्या तरुणाईमध्ये असलेली अज्ञानाची चिंता हि प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे पाश्च्यात्य संस्कृतीचे अनुकरण ना करता आपल्या स्वतःच्या संस्कृतीचे जातं कसे करता येईल ह्याकडे लक्ष द्या 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News