CBSE बारावीचा पुनर्मुल्यांकन निकाल जाहीर; असा मिळणार पाहायला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 2 September 2020

बारावीत अनेकांना अनपेक्षीत यश मिळाले मात्र, काही विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करूनही अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाही. अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता.

मुंबई : अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावी निकाल १३ जुलै २०२० रोजी जाहीर झाला. बारावीत अनेकांना अनपेक्षीत यश मिळाले मात्र, काही विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करूनही अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाही. अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. पुनर्मूल्यांकनाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. सीबीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर cbse.nic.in आणि cbseresults.nic.in संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी मिळणार आहे. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाल्यास मंडळाशी संपर्क करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

निकाल कसा पाहावा 

सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in संकेतस्थळावर जावे. सीनियर स्कूल सर्टिफिकेट एक्झाम क्लास बारावी (Senior School Certificate Examination (Class XII) Results 2020) दिसेल, त्यावर विद्यार्थ्यांना क्लिक करावे लागेल. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल, या पेजमध्ये विद्यार्थ्यांना रोल क्रमांक (Enter your Roll Number), शाळा नंबर (Enter School No) सेंटर क्रमांक (Enter Centre No) हॉल तिकीट आयडी (Enter Admit Card ID) नोंदवावा लागेल. त्यानंतर हा अर्ज सबमिट करावा. विद्यार्थ्यांना कम्प्युटरच्या स्क्रीनवर निकाल दिसेल. या निकालाचे प्रिंट घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशाप्रकारे विद्यार्थी निकाल पाहू शकतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News