CBSE विद्यार्थी 'या' कारणामुळे सर्वोच्च न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020
  • संपूर्ण देशावर कोरोना माहामरीचे संकट आले आहे.
  • त्यात विद्यार्थींच्या परीक्षा घेणे म्हणजेच विद्यार्थांच्या जीवाशी खेळ्यासारखे होईल.
  • देशभरातून एकूण सुमारे ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सीबीएसई फेरपरीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

नवी दिल्ली :- संपूर्ण देशावर कोरोना माहामरीचे संकट आले आहे. त्यात विद्यार्थींच्या परीक्षा घेणे म्हणजेच विद्यार्थांच्या जीवाशी खेळ्यासारखे होईल.  देशभरातून एकूण सुमारे ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सीबीएसई फेरपरीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून सीबीएसईच्या फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयाची दखल घेऊन (स्यू मोटो) सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. कोविड - १९ महामारी काळात परीक्षा घेण्याचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय विद्यार्थी हिताचा नाही, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

ऑल इंडिया स्टुडंटस असोसिएशनचे राष्ट्रीय महासचिव संदीप सौरव हे या विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत आहेत. सौरव यांनी ८०९ विद्यार्थ्यांच्या वतीने हे पत्र लिहिले आहे आणि सरन्यायाधीश एस. ए. बोबडे आणि अन्य न्यायमूर्तींकडे या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. करोना संसर्गकाळात परीक्षा घेण्याचा सीबीएसई बोर्डाचा निर्णय केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पालक, शिक्षक, अन्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण करणारा आहे.

दहावी, बारावी फेरपरीक्षेसंदर्भात सीबीएसईकडून अद्याप कोणतंही वेळापत्रक जारी करण्याच आलेले नाही. पण अनेक कॉलेजांनी परीक्षांच्या डेडलाइन्स दिल्या आहेत, असे विद्यार्थ्यांनी या पत्रात म्हटले आहे. कोविड -१९ महामारीची स्थिती सामान्य होईपर्यंत परीक्षा घेतली जाऊ नये अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

सीबीएसई दहावीचे १,५०,१९८ आणि बारावीचे ८७,६५१ विद्यार्थी एका विषयात अनुत्तीर्ण आहेत, त्यामुळे त्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. जे विद्यार्थी पाच मुख्य विषयांपैकी एका विषयात अनुत्तीर्ण असतात त्यांना ही कम्पार्टमेंट परीक्षा देऊन वर्ष वाया न घालवण्याची संधी दिली जाते. दरम्यान, बिहार आणि तेलंगण राज्यांनी या कम्पार्टमेंट परीक्षा रद्द केल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News