CBSE बोर्ड दहावी-बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 July 2020

सीबीएसई बोर्डाकडून परीक्षेच्या निकालबाबत तयारी सुरू आहे. निकालाचं काम अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच निकालाची अंतिम तारीख जाहीर होईल. 

CBSE बोर्ड दहावी-बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात 

कोरोनाच्या काळात परीक्षांना विलंब झाला, त्याचबरोबर काही परीक्षा अर्धेवट झाल्या, काही परीक्षांचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. अशातचं सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख घोषित केल्याची माहिती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फिरत आहे. याबाबत सीबीएसई बोर्डकडून अधिकृत अशी कोणतीही माहिती जाहीर केली नसल्याचे अधिका-यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अनेक माध्यमांनी सीबीएसई बोर्डाच्या निकालाची माहिती दिल्याने गोंधळ झाला होता. 
 

सोशल मीडियावर सध्या निकालाबाबतची फिरत असलेल्या माहिती चुकीची आहे. सीबीएसई बोर्डाच्या निकालाबाबत एक नोटीस सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र ही नोटीस खोटी असल्याचे सीबीएसई बोर्डाच्या अधिका-यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अशा वायरल मेसेजवरती विश्वास ठेऊ नका असं सीबीएसई बोर्डाच्या अधिका-यांनी सोशल मिडीयावरती सांगितले आहे. 

 

सुप्रीम कोर्टाला काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाने  दिलेल्या माहितीत जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करू असं म्हणटलं होतं. पण सीबीएसई बोर्डाकडून अद्याप तसं अधिकृत समोर काही आलेलं नाही. सीबीएसई बोर्डाकडून परीक्षेच्या निकालबाबत तयारी सुरू आहे. निकालाचं काम अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच निकालाची अंतिम तारीख जाहीर होईल. 

कोरोनाचा कहर देशभरात झाला आहे, संसर्ग वाढतच असल्याने सरकारी यंत्रणांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या वर्षी निकाल लागेल का ? शैक्षणिक वर्ष सुरू होईल का ? अशी शंका पालकांना वारंवार सतावत आहे. त्यातचं विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन शिक्षण आणखी किती दिवस घ्यावे लागेल ? प्रत्यक्षात कॉलेज सुरू होईल का अशा विविध शंका विद्यार्थ्यांच्याही मनात आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News