सुशांत सिंग प्रकरणाची सीबीआय चौकशी; वाचा यावर काय म्हणाले दिग्गज कलाकार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 August 2020

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देशातील दिग्गज कलाकारांनी ट्विटद्वारे आपले मत व्यक्त केले.

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची आता सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन (सीबीआय) संस्थेमार्फत चौकशी होणार आहे. सीबीआयने सुशांत सिंग प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी बिहार पोलिस, केंद्रीय गृह मंत्रालय, आणि काही कलाकारांनी सुप्रीम कोर्टाला केली होती. या मागणीचा विचार करुन सु्प्रीम कोर्टाने बिहार पोलिसात दाखल केलेली एफआयआर ग्राह्य धरली. आणि त्या आधारावर सीबीआयला चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे सुशांत सिंहच्या चाहत्यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. सुशांत सिंग यांच्या  सीबीआय निर्णयानंतर #CBITakesOver हा हाश टॉग ट्रेड ट्विटरवर सुरू झाला.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देशातील दिग्गज कलाकारांनी ट्विटद्वारे आपले मत व्यक्त केले. सुशांत सिंगच्या प्रकरणावर सर्वप्रथम भाष्य करणारी अभिनेत्री कंगना राणावत यांनी एक ट्विट केले. 'माणुसकी जिंकली' सुशांत सिंग योद्ध्यांचे अभिनंदन! प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात जनता एकत्र आली. प्रकरणाची धुरा आता सीबीआय सांभाळेल' असे म्हटले आहे.

 

त्यानंतर सुशांत सिंगची बहिण स्वेता सिंग किर्ती म्हणाली 'फायनली सीबीआय या प्रकरणाची चौकशी करणार'.

 

अभिनेता अक्षय कुमार यांनी म्हटलंय 'सुप्रीम कोर्टने सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले, त्यामुळे खरं काय समोर येईल'. असे सांगितले.  'रिय चक्रवर्ती यांची मागणी होती की हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, असे तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॉक करून ट्विट केले होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ही गोष्ट लक्षात घेतली. आता खरी मजा येईल' असे अशोक पंडित यांनी म्हटले.

कमल रशिद खान यांनी धक्कादायक ट्विट केले. त्यात म्हटले 'मला अतिशय दुःख झाले, सुशांत सिंग राजपूत हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले त्यामुळे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले. आजपर्यंत देशातील सर्वश्रेष्ठ पोलीस म्हणून मुंबई पोलिसांचा गौरव केला जात होता मात्र युपी, बिहार पेक्षाही खराब वागणूक मुंबई पोलिसांनी दिली' अस खेजनक ट्विट केलं आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News