सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा - देवेंद्र फडणवीस 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020

ईडीच्या ताब्यात हे प्रकरण दिल्याने सुशांतच्या बॅंक खात्याशी संबंधित सर्वांची चौकशी करणार असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चर्कवर्तीची स्पेशल चौकशी करणार असल्याचे सुध्दा सांगितले आहे. 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा - देवेंद्र फडणवीस 

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. विशेष म्हणजे सध्याच्या घडामोडीवरून या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळल्याचे स्पष्ट झालं आहे. कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. तसेच बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी सुध्दा मुंबई पोलिसांवर टीका केली आहे. 

आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत व्हावा अशी अनेकांची इच्छा आहे, पण राज्य सरकारची तशी इच्छा नसल्याचे दिसते आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ईडीने तरी ईसीआयआर दाखल करुन मनी लॉन्ड्रिंग आणि मनी ट्रेलिंगबाबत चौकशी करावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

बिहार पोलिसांना मुंबई पोलिस मदत करत नसल्याचे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीर कुमार मोदी म्हणणे आहे, तर बिहार पोलिस या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंबईत आले आहेत. बिहार पोलिस मुंबईत चौकशी करत असताना पाटण्यातील पोलिस महासंचालक कार्यालयात उच्चस्तरीय एक बैठक सुध्दा सुरू होती. बिहारच्या पोलिसांना मदत करण्याऐवजी महाराष्ट्र पोलिस अडचणी निर्माण करीत आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी बिहार पोलिस मुंबईत आले आहेत, त्यामुळे सीबीआयने या प्रकरणाची दखल घ्यावी असं भाजपला वाटतं आहे असं सुशील कुमार यांनी सांगितले. 

Mumbai police is putting obstruction in way of fair investigation by Bihar police in Sushant death case.Bihar police is doing its best but Mumbai police is not co operating .Bjp feel that CBI shud take over this case.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News