दुपारचं जेवण केल्यानंतर झोप येण्याची समस्या असेल तर 'हे' करा!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019

अनेक लोकांना दुपारचं जेवण केल्यानंतर मस्तपैकी झोप काढण्याची सवय असते. पण नोकरी करणाऱ्या, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी मात्र हे शक्‍य नसतं. दुपारचं जेवण केल्यावर झोप येऊ लागते आणि सोबतच आळसही येतो. पण असं का होत असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का?

अनेक लोकांना दुपारचं जेवण केल्यानंतर मस्तपैकी झोप काढण्याची सवय असते. पण नोकरी करणाऱ्या, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी मात्र हे शक्‍य नसतं. दुपारचं जेवण केल्यावर झोप येऊ लागते आणि सोबतच आळसही येतो. पण असं का होत असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का?

खरं तर दुपारचे जेवण केल्यावर झोप येण्याचं कारण पचनतंत्राशी संबंधित आहे. जेवण केल्यानंतर जेव्हा आपल्या शरीरात पचनक्रिया सुरू होते तेव्हा पचन संस्थांना अन्न पचवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जेची गरज असते. अन्न पचवण्यासाठी त्यांना अतिरिक्त एंजाइमचा स्राव करावा लागतो. ही गरज रक्तातून भागवली जाते. अशा स्थितीत रक्तप्रवाह पचनसंस्थांकडे अधिक वळवला जातो. परिणामी यावेळी मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो. मेंदूमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्याने मेंदू कमी क्रियाशील होतो. ज्यामुळे थकवा आणि आळस येतो. त्यामुळे झोपही येऊ लागते.  

जेवणानंतर तुम्हाला झोप येण्याची समस्या असेल तर 

जर तुम्ही नोकरी करता, ऑफिसमध्ये काम करता आणि दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला झोप येण्याची समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी एक मार्ग आहे. दुपारच्या जेवणात कमीत कमी कॅलरी असाव्यात असा तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे हलका आहार घ्या. जास्त कॅलरी असलेला आहार घेतल्याने जास्त झोप येते. डीप फ्राय आणि हेवी फूड पचवण्याला पचनसंस्थेला अधिक काम करावे लागते. त्यामुळे दुपारच्या जेवणात तळलेले पदार्थ आणि पचायला जड पदार्थ यांचा समावेश करणे टाळा.

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News