बदलत्या जीवनशैलीमुळे बरेचजण स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही.कालांतराने आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते, आणि एकेक आजार आपले डोके वर काढतात. मात्र शरीराचा मह्त्वाचा भाग म्हणजे पहिला कणा . ह्याच्या आधारावर आपण ताठ पाने उभे असतो रोजचे आपले काम करतो . पण सध्याच्या धावत्या युगात हाच पाठीचा कणा कमकुवत होत चालला आहे. त्यामुळे पाठदुखीचा हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो.
अनेकांना कामानिमित्त ऑफिसमध्ये दिवसरात्र कॉम्प्युटर समोर बसून काम करावं लागतं, बस किंवा ट्रेननं प्रवास करताना तासन् तास उभं राहून प्रवास होतो. हा प्रवास करताना पाठीवर असलेल्या बॅगेमुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो. बऱ्याचदा आपण चुकीचं झोपतो, ताठ बसत नाही, बरीचशी कामं बसूनच करतो. पाठीच्या कण्याच्या रचनेत ३३ मणक्यांचा समावेश असतो. यात मानेमध्ये सात, छातीच्या मागच्या भागात बारा, कंबरेमध्ये पाच आणि माकडहाडाचे पाच मणके एकमेकांशी सांधलेले असतात. त्याच्या खाली तीन ते पाच मणके जुळलेल्या स्थितीत असतात, त्याला कॉसिकस म्हटलं जातं. हा कण्याचा शेवटचा भाग असतो. दोन मणक्यांच्या सांध्यामध्ये रबरासारखी एक चकती असते, तिला डिस्क म्हणतात. या डिस्कमध्ये हादरे आणि धक्के शोषून घेण्याची क्षमता असते.
धावताना आणि उड्या मारताना बसणारे धक्के सहज सहन केले जातात. कण्यामध्ये असलेल्या मज्जारज्जूला चहूबाजूंनी सुरक्षित ठेवण्याचं काम पाठीचा कणा करतो. त्यामुळे मानवी शरीरात या पाठीच्या कण्याचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे.
पाठदुखीपासून लांब राहण्यासाठी एकाच जागी जास्त वेळ बसणं टाळा. स्नायूंची हालचाल होण्यासाठी, त्यांना आराम मिळवा म्हणून काम करताना विश्रांती घ्या. मानेची हालचाल करा.पाठीला आधार मिळेल अशा खुर्चीचा बसण्यासाठी वापर करा. झोपताना पाठीला आधार मिळेल अशा टणक पृष्ठभागावर झोपा. हिल्सच्या चपला, बूट वापरणं टाळा. वजन नियंत्रणात राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.पाठदुखीसाठी योगासनं हा रामबाण उपाय मानला जातो. नियमित योग केल्यामुळे मणक्याचे स्नायू अधिक लवचिक आणि बळकट होतात.
पाठदुखीसाठी योगासनं हा रामबाण उपाय मानला जातो. नियमित योग केल्यामुळे मणक्याचे स्नायू अधिक लवचिक आणि बळकट होतात. परिणामी, पाठीच्या दुखण्यामुळे होणाऱ्या समस्या टाळता येतात. त्यामुळे योगासनं करताना प्रत्येकानं किमान १० सेकंद एका आसनाच्या स्थितीत बसावं. तसंच, पाठीचा कणा बळकट करण्यासाठी आसनं किमान दोन ते तीन वेळा करावी.पवनमुक्तासन,भुजंगासन ही दोन आसने पाठदुखी टाळण्यासाठी करावी