खेकडे आणि माकडे

प्रमोद चुंचूवार
Saturday, 6 July 2019

वीज चोरतो कुणी 
टाकुनी आकडे
धरण फोडतो कुणी

वीज चोरतो कुणी 
टाकुनी आकडे
धरण फोडतो कुणी
पाठवूनी खेकडे

निवडून दिली तुम्ही
ती माणसे होती
मंत्री होताच झाली
ती मद्यपी माकडे

धरण फुटून भले
मरोत कितीही माणसे
पाणी तुंबून भले
बुडोत किती माणसे

भ्रष्ट-बंधुभाव आमुचा
घेतो एकमेका सांभाळूनी
टक्केवारीत लोळतो आम्ही
कोण करेल आमचे वाकडे?

घालता तुम्ही शिव्या 
विसरून जाता लगेच
चौकशीत निर्दोष आम्ही
सारे करुनी नामानिराळे

निवडणूक जिंकतो वापरून
जात पात धर्म विचारधारा
अडकता अलगद तुम्ही
टाकतो ऐसी सापळे

संघटित आमची ही
चिरंजीव आहे लूटशाही
म्हणत रहा हीच लोकशाही
षंढ जनहो तुम्ही आहात बुळे

निवडून दिली तुम्ही
ती माणसे होती
मंत्री होताच झाली
ती मद्यपी माकडे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News