CAT परीक्षेची नोंदणी सुरु; जाणून घ्या! सविस्तर वेळापत्रक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 August 2020

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर प्रवेशासाठी आणि इतर प्रवेशाकरिता कॅट परीक्षा देणे अनिवार्य आहे.

मुंबई : कॉमन ॲडमिशन टेस्ट २०२० अर्थाच कॉट (CAT) प्रवेश प्रक्रियेला आज पासून सुरुवात झाली. बुधवार 5 आगस्ट २०२० ते १६ सप्टेंबर २०२० पर्यंत प्रवेशसाठी नोंदणी करता येणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर प्रवेशासाठी आणि इतर प्रवेशाकरिता कॅट परीक्षा देणे अनिवार्य आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील अतिषय महत्त्वाची कॉट परीक्षा मानली जाते. उच्च शिक्षणाचे द्वारे या परीक्षेमुळे खुली होतात.   

कोण करु शकतो अर्ज

  • सर्वसाधारन उमेदवारांना पदवी परीक्षेत पन्नास टक्के गुण मिळवलेला उमेदवारा अर्ज करु शकतो
  • अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्ग यांच्यासाठी 45 टक्के गुण
  • जे उमेदवार पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात आहेत त्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली. 
  • ज्या उमेदवारांनी पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली मात्र, त्यांचा निकाल लागला नाही असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत 

अर्ज कसा करावा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://iimcat.ac.in/ या कॉटच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. 'न्यू कॉन्डीडेट रजिस्ट्रेशन'वर क्लिक करुन नाव नोंदणी करावी, त्यात विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहिती भरून सबमिट करावे. त्यानंतर उमेदवारांना 'रजिस्ट्रेशन कॉन्डीडेट लॉगीन'वर जाणून संपुर्ण अर्ज भरावा लागेल.  परीक्षा शुक्क भरल्यानंतर अर्ज पुर्ण होईल. सर्वसाधारण उमेदवारांना दो हजार रुपये, एससी, एसटी, दिव्यांग उमेदवारांना एक हजार रुपये फी आकारण्यात आली आहे.

CAT परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक

  • ऑनलाईन प्रवेश नोंदणी :  5 आगस्ट २०२० पासून सुरुवात 
  • ऑनलाईन प्रवेश नोंदणी अंतिम तारीख : १६ सप्टेंबर २०२० 
  • प्रवेश पुर्व परीक्षेचे अॅमीट कार्ड :   २८ ऑक्टोंबर २०२०
  • प्रवेश पुर्ण  परीक्षा : २९ नोव्हेंबर २०२०

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News