देशात जातिवाद वाढतोय का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 August 2020
  • आमची चर्चा, माझ मत...
  • शिक्षणामुळे मानवात वैचारिक प्रगती झाली, समाज सुशिक्षित झाला तरी जात काय राहिली.

मुंबई : देशातील अनेक समाज सुधारकांनी जात नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले, सपुर्ण आयुष्य खर्ची घातले, आजही प्रयत्न चालू आहे तरी देखील जात नष्ट झाली नाही. शिक्षणामुळे मानवात वैचारिक प्रगती झाली, समाज सुशिक्षित झाला तरी जात काय राहिली. इरावती कर्वे म्हणतात 'जी कधी जात नाही ती जात'  देशात जातीवाद वाढतोय का? कारण? याकडे तुम्ही कसे पाहता' याविषयी तरुणाईसोबत सोबत आज मनसोक्त चर्चा करण्यात आली. यावेळी तरुणाईने व्यक्त केलेल्या काही निवडक प्रतिक्रीया आम्ही देत आहोत.

महाराष्ट्रपेक्षा इतर राज्यात अजूनही जात, पात खूप मोठ्या प्रमाणात पाळली जाते, त्यामुळे इतर राज्यात जातीवाद जातीवादाचा विध्वंश निर्माण होत आहे.
- अजिंक्य भालेराव

जातीवाद हा शब्दचं मी मानत नाही कारण जात ही मानवाने निर्माण केलेली एक समाजवादी संकल्पना आहे आणि याचा फायदा घेऊन आज पर्यंतचे सर्व पक्ष आणि नेते यांनी जातीवादाला अपरत्यक्षरीत्या प्रोत्साहन दिले आहे. मी तर म्हणेन राजकारणी लोकांनी जातीवाद आजपर्यंत टिकवून ठेवला आहे. तो फक्त त्यांच्या फायद्यासाठी अन् त्यामध्ये सामान्य माणूस हा चिरडल्या जात आहे. दुसरी गोष्ट आपण सुशिक्षित असूनही जातीवादला प्रोत्साहन देतो, आपल्या मुलांना त्याबद्दल जागृत करायचे सोडून त्यांच्यामध्ये जातीवादी विचार रुजवतो हे चुकीचे आहे. जात ही मानवाने तयार केली आणि जात आणि जातीवादचा शेवटही माणूसच करू शकतो. तर आज पासून आपण सर्वांनी मिळून एक प्रयत्न करूयात आपल्या मुलांना व इतर आपल्या सनिध्यातल्या इतरांना जागृत करू... माझ्या मते आपल्या मुलांच्या टीसीवर जात व धर्म नसले पाहिजे. तरच एक दिवस असा येईल की ज्या दिवशी माणुसकी हा एकच धर्म एक आणि माणूस ही एकच जात असेल. सहमत आहात का तुम्ही?.
- जग्गनाथ उगले

निसर्गाने मानवाला बनवले आणि मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी जाती व्यवस्था निर्माण केली. जातीवाद फार पु्र्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. आजही जातीवादाचे प्रमाण जास्त आहे. शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागात जातीवाद पाहायला मिळतो. याला अशिक्षित आणि शिक्षिक दोन्ही वर्ग जबाबदार आहेत. जाती व्यवस्था नष्ट झाली म्हणने चुकीचे आहे. कारण मानवाने मानवाला महत्त्व दिले नाही तर जातीला महत्व दिली. मानवाने माणुसकीला महत्त्व दिले तर एक जातीवाद संपेल. 
- कृष्णा गाडेकर

आज देशातील जातीवाद वाढतोय हे खरे आहे. जातीवाद समाजवादी नसून विषमतेवर आधारित आहे आणि माणसांचे माणसाने शोषण करणारी सामाजिक व्यवस्था आहे. आज स्वातंत्र्य प्राप्तीच्या 70 वर्षानंतर देखील जातीवादी विटंबना, हल्ले, मारहाण, दंगली होतंच आहेत. जातीवाद मोडून काढण्याची जवाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे परंतु आजची तरुण पिढी, एक करोड या जातीचा ग्रुप ते एक करोड त्या धर्माचा ग्रुप अशा विषारी लोकांच्या बंधनात अडकलेली आहे. स्वतःला आधुनिक व पुरोगामी म्हणणाऱ्या लोकांत ही छुपा जातीवाद वाढला असून खासगी व सरकारी क्षेत्रात काम करत असताना बिगरजातीच्या लोकांचे पाय खेचतात. ज्यांनी पिढ्यानपिढ्या जातीवाद सहन केला ते देखील जात सोडायला तयार नाहीत. किती दलित लोक आंतरजातीय विवाह करतात?
- विष्णू कांबळे

जात, हा एक बंद वर्ग आहे विचार करायला गेले तर नेमके ही जात आली कुठून, तर जात माणसाने निर्माण केली आहे, माणूस जन्म घेत असताना काय जात घेऊन येत नसतो. तो ज्या जातीत जन्माला येतो, तो त्याच जातीचा होतो हे सर्व माणसाने निर्माण केले आहे. खर तर जाती वाद अशिक्षित माणसे करतात, त्यामुळे सर्वांना शिक्षण दिले पाहिजे, अनेक समाजसुधारकांनी जाती वाद नष्ट करण्यासाठी काम केले, तरीही लोकांनी त्यांनाच वाटून घेतले, किती लाजिरवाणी बाब आहे, की भारतासारख्या विकसनशील देशात असे विचारायचे लोक राहतात. देशाचा प्रश्न आला की सर्वजण एक होतात म्हणे आम्ही भारताचे लोक, आणि मग एखादी योजना गरिबाला मिळाली, तसेच गरिबांचे कल्याण झाले की लगेच कोणती योजना मिळाली, कोणत्या जातीचा आहे, त्यांनाच का असे मात्र होते तेंव्हा मात्र देशाचा विचार करत नाहीत, त्यांना का? आम्हाला का नाही, पण समजून घेतले तर एखाद्या गरिबांचे कल्याण झाले, आपल्याला काय करायचे. मिळूदे त्यांना असे लोक विचार करत नाहीत. आता सुद्धा ग्रामीण भागातील गावामधे जातीवाद केला जातो, अस्पृश्य लोकाना मंदिरात जाऊ दिले जात नाही. त्यांची शिवाशिव चालत नाही, अजुन पण त्यांना तुच्छ समजले जाते, का? मला वाटते ह्याचे कारण म्हणजे लोकांचे ते बळकट विचार आणि अशिक्षित पणा हेच कारण मला वाटते.
- सुरज कांबळे

जातीव्यवस्था ही प्राचीन भारता पासून चालत आलेली आहे. आणि आधुनिक भारतात या व्यवस्थेला मात करण्यासाठी आरक्षण लागू करण्यात आले. तरीही जातीवाद संपलेला दिसत नाही आहे याऊलट तो महामारी सारखा पसरत चालला आहे. याला कारणीभूत मी आजच्या अशिक्षीत नाही तर सुशिक्षीत वर्गाला मानतो, कारण हा वर्ग आपली तर्क विवेकबुद्धी चुकीच्या दिशेने जातीचे श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी वापरत आहे. मी मांग, मी महार, मी कुंभार, मी माळी, मी धनगर, मी मराठा, मी अमूक, व मी तमुक बस यातच श्रेष्ठत्व मानत आहे. आज आपण येवढे मोठे झालो की चक्क युगपुरुषानाच वाटून घेतलय, छत्रपती मराठ्यांचे, आंबेडकर दलितांचे, अहिल्या होळकर धनगरांची.. जाता जात नाही ती जात इंग्रजांनी केली वाताहात, आपण बनवले गेलो हातोहात, आतातरी उठा धरा माणुसकीचा हात. पटत असेल तर आचरणात आणा, नाहीतर आजही कोणाचा तरी गुलाम म्हणून जगा.
-अजय डुमनवाड

मी मागे या टॉपिक वर लेख घेतला होता. कही करणास्तव पूर्ण नाही करू शकलो... "जात" खरच आहे का अस्तित्वास? आणि असेल तर कुणासाठी? याला काही अपवाद असु शकतात का, आणि असेल तर ती लोक? मला वाटत या जगात दोनच व्यक्ती सुरक्षित आहेत. जातीपासून एक म्हणजे भिकारी आणि दुसरी म्हणजे देह विक्री करणारी. यांना कोणी जात विचारत नाही! भिक्षेकरुणांना जात विचारली जात नाही, त्याच्या भीकारी हा खुप मोठा लेबल आहे. या पेक्षा अजुन काय असेल मोठ. आणि राहिल्या वेश्या हे ब्रम्हणनाना, मुस्लिमांना, शिख, बोद्ध, सर्वच जाती धर्मातील लोकालाच जात न विचारता हवी असणारी एकमेव गोष्ट म्हणजे वेश्या... हेच वाचले आहे लोक जात न विचरण्यापासून...
- रोशन सुर्यवंशी

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News