सावधान! स्त्रियांना दूध पिणं पडू शकतं महागात; होईल 'हा' गंभीर आजार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020
  • वाढत्या वयाप्रमाणे मानवी शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे योग्य वयानुसार शरीराच्या वाढीसाठी पोषक आहाराची गरज असते. माणसाचं जसंजस वय वाढतं तसंतस त्याच्या शारीरिक आरोग्याच्या तक्रारी वाढत असतात.

वाढत्या वयाप्रमाणे मानवी शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे योग्य वयानुसार शरीराच्या वाढीसाठी पोषक आहाराची गरज असते. माणसाचं जसंजस वय वाढतं तसंतस त्याच्या शारीरिक आरोग्याच्या तक्रारी वाढत असतात. त्यामध्ये जास्त प्रमाणात  हाडांच्या समस्या जाणून येतात. कारण वाढत्या वयाप्रमाणे हाडं कमकुवत होऊन सांधेदुखीचे आजार चालू होतात. स्त्रियांमध्ये हाडांच्या समस्याचे प्रमाण जास्त आढळून येते.  तर त्यांच्या तुलनेत पुरुषांमध्ये या समस्येचे प्रमाण हे कमी असते.

कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात.म्हणूनच कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्यासाठी दुधाला जास्त प्राधान्य दिले जाते. कारण अधिकाधिक कॅल्शिअम असणारा घटक म्हणून दुधाकडे पाहिले जाते.  त्यामुळेच हाडांची समस्या असणाऱ्या स्त्रियांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु दूध पिणाऱ्या स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

नुकताच अमेरिकेतल्या लोमा लिंडा युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी एक संशोधन केले. या संशोधनात ८ वर्षे उत्तर अमेरिकेतील एकूण  ५३ हजार महिलांचा आहार, अल्कोहोलाचे प्रमाण, त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे का? त्यासंबंधी काही औषधे चालू आहेत का? इ. विषयी माहिती मिळविण्यात आली. यावरून असे सिद्ध झाले की, नियमित दूध पिणाऱ्या महिलांना ८० टक्के ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका असतो. 

अलीकडच्या काळात स्त्रियांमधेय ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढले असून भारतात प्रत्येकी  ८ पैकी एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे समोर आले. त्यामुळेच योग्य वेळी ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे. 

ही आहेत ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे:

  • १)ब्रेस्टच्या त्वचेमध्ये बदल
  • २) ब्रेस्टचा आकार आणि रंग बदलणं
  • ३) निपलमध्ये बदल जाणवणे
  • ४) स्तनांमध्ये गाठ जाणवणे
  • ५) ब्रेस्टमधून दुधाशिवाय इतर स्राव येणं
  • ६)  ब्रेस्टला सूज येणं, खाज येणं यांसारखी लक्षण आढळ्यास त्वरित त्यावर उपचार करणं गरजेचे आहे. 
     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News