सावधान! वजन कमी करण्यासाठी 'या' गोळ्यांचा वापर; तरुणीचा मृत्यू

यिनबझ टीम
Tuesday, 11 February 2020

मेघनाने आपण डाइनिट्रोफेनॉल नावाच्या टॅब्लेटचे सेवन केल्याचे सागिंतले होते, मात्र रिसर्चच्या अंती डाइनिट्रोफेनॉल नावाच्या या टॅब्लेटवर केंद्र सरकारने खूप दिवसांआधी पुर्ण देशभरात बंदी घातली होती.

मुंबई - सध्या वजन कमी करण्याची क्रेझ सर्रास तरुणींमध्ये दिसून येते, मात्र काही तरुणी केंद्र सरकारने बंदी घातलेल्या गोळ्यांचे सेवन करू आपले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा बंदी घातलेल्या गोळ्यांचे सेवन करून आपलं वजन कमी करणाऱ्या एका फिटनेस ट्रेनरचा मुंबईत मृत्यू झाला आहे.

मुंबईच्या नौपाडा पोलीस स्टेशन आवारात राहाणाऱ्या मेघना देवगडकर (वय 22) ही परिसरातील एका जीममध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेघनाला स्वत:चे वजन कमी करायचे होते, म्हणून तिने एका औषधाचे सेवन केले होते, जीममध्ये गेल्यानंतर तिला उलटी होण्याचा त्रास सुरू झाला, काही किरकोळ कारण असेल म्हणून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथल्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार तिला मुंबईच्या लाईफलाईन आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे सायन रुग्णालयात गेल्यावर  डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले मात्र हा मृत्यू अॅक्सिडेंटल मृत्यू म्हणून नोंदविण्यात आला. 

लाईफलाईन येथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मेघनाला हाइपरथर्मियाच्या आजाराने ग्रासले होते. या आजाराच्या रुग्णांना श्वास घेताना मोठ्या वेदना होत असतात, सोबत ब्लडप्रेशरचाही त्रास जाणवतो. हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते, अशाचप्रकारचा त्रास संबंधीत टॅब्लेटचे सेवन केल्यानंतर मेघनाला सुरू झाला होता.

पहिल्या तपासणीच्या वेळी मेघनाने आपण डाइनिट्रोफेनॉल नावाच्या टॅब्लेटचे सेवन केल्याचे सागिंतले होते, मात्र रिसर्चच्या अंती डाइनिट्रोफेनॉल नावाच्या या टॅब्लेटवर केंद्र सरकारने खूप दिवसांआधी पुर्ण देशभरात बंदी घातली होती, मात्र आजही अशा बंदी घातलेल्या औषधांची ऑनलाईन विक्री सुरूच आहे.

UK च्या मेडिसिन एँड हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेगुलेटरी एजेंसी (MHRA) ने दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काहीदा माहित ही नसते की आपण आपल्या शरिरामध्ये कोणत्या गोष्टी भरत असतो. आपल्या शरिराचा आकार कमी करणाऱ्या गोळ्या आपल्या हृदयाचे ठोके वाढवत असतात. त्यातच  जर आपल्याला हृदयाचा त्रास असेल तर आपण अजून मोठ्या आजाराची शिकार होऊ शकतो.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News