सहा तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांनो सावधान 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 11 October 2019

'ड' जीवनसत्त्वाचं अतिरिक्त सेवन हे तुमच्या हाडांसाठी हानिकारक असतं, हे अहवालात सिद्ध झालं आहे. अभ्यासाचा एक भाग म्हणून सर्वेक्षणाआधी आणि नंतर दोन्ही वेळा काही प्रौढ व्यक्तींचा सिटीस्कॅन काढण्यात आला.

हृदयविकार आणि अपुरी झोप यांचा जवळचा संबंध आहे. एका निरीक्षणात्मक सर्वेक्षणात निदर्शनात आलं आहे. सहा तासांपेक्षा कमी आणि नऊ तासांपेक्षा जास्त झोप ही तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

'ड' जीवनसत्त्वाचं अतिरिक्त सेवन हे तुमच्या हाडांसाठी हानिकारक असतं, हे अहवालात सिद्ध झालं आहे. अभ्यासाचा एक भाग म्हणून सर्वेक्षणाआधी आणि नंतर दोन्ही वेळा काही प्रौढ व्यक्तींचा सिटीस्कॅन काढण्यात आला. ज्यात हात आणि पायांच्या हाडांमध्ये होणाऱ्या बदलांचं निरीक्षण करण्यात आलं. याच सोबत 'ड' जीवनसत्त्वाच्या अतिरिक्त सेवनाने कर्करोग, मुतखडा, यकृताचे विकार, फ्रॅक्चर यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वनस्पतींमधून म्हणजेच भाज्या, धान्य आणि डाळी यापासून मिळणारं प्रथिनं हे मांसाहारपासून मिळणाऱ्या प्रथिनांच्या तुलनेनं जास्त फायद्याचं असतं. संशोधकांच्या एका चमूनं जपानमधील ७०,६९६ पुरुष आणि महिला नागरिकांना घेऊन सर्वेक्षण केलं. ज्यात १८ आणि ५५ वयाच्या लोकांचा समावेश होता. त्या व्यक्तींच्या पूर्वजांमध्ये कर्करोग आणि हृदयासंबंधित विकारांचा इतिहास नव्हता. यादरम्यान सर्वेक्षण सहभागी असणाऱ्या व्यक्तींमधील १२,३८१ मृत्यू नोंदवले गेले. 

व्यसनाच्या सवयी, लैंगिक जीवन, शारीरिक हालचाल, बॉडी मास इंडेक्स आणि तत्सम आणखी काही शारीरिक संभाव्यता लक्षात घेतल्यानंतर संशोधकांना असं लक्षात आलं की, संशोधनात सामील असणाऱ्या पाचव्या गटातील लोकांनी पुरेशा प्रमाणात वनस्पतीतून मिळणाऱ्या प्रथिनांचं सेवन केलं आहे. त्यामुळे त्या गटाला इतरांच्या तुलनेनं २८ टक्क्यांनी हृदयविकाराच्या झटक्याचा धोका, २८ टक्क्यांनी हृदयाशी संलग्न विकारांचा धोका आणि २७ टक्क्यांनी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका कमी असतो, हे सिद्ध झालं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News