सावधान! 'मिडल फिंगर' दाखवल्यावर होऊ शकते "ही" शिक्षा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 23 September 2019

नवी दिल्ली: महिलांना विचित्र हावभाव करुन त्यांना हिणवने पुरुषांना चांगलेच महागात पडणार आहे, असे कृत्ये करणाऱ्या एका व्यक्तीवर कोर्टात अशीचं एक केस सध्या सुरु आहे. दिराने आपल्या वहिनीला मधले बोट दाखवुन अश्लिल चाळे करत होता, आरोपी दिराच्या विरोधात महिलेने केस दाखल केली. सध्या ही केस कोर्टात सुरु आहे.  

नवभारत टाइम्सने या वृत्तापत्राने दिलेल्या माहितीनुसार, न्यायदंडाधिकारी वसुंधरा आझाद म्हणाल्या 'अशाप्रकारचे हावभाव करत त्रास देणे हे महिलेच्या सन्मानाच्या विरोधात आहे, दोषीला जास्तीत जास्त तीन वर्षाचा तुरूंगवास आणि दंड भरावा लागू शकतो'.

महिलेने २१ मे २०१४ मध्ये तक्रार केली होती की, आरोपीने मिडल फिंगर दाखवून घाणेरडी शेरेबाजी आणि मारझोडही केली. चौकशीनंतर पोलिसांनी कलम ५०९ आणि ३२३ नुसार तक्रार दाखल करून घेतली होती. ८ ऑक्टोबर २०१५ ला आरोपी विरोधात केस तयार केली होती. 

आरोपीने कोर्टात स्वत:चा बचाव करताना दावा केला होता की, हा वाद संपत्तीचा होता आणि त्यासंबंधीत त्याच्या बहिणीने कोर्टात अशी साक्ष दिली की, तो दिवसभर घरीच होता आणि महिलेने त्याच्या विरोधात खोटी तक्रार केली आहे. कोर्टाला संपत्तीच्या वादाचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे कोर्टाने आरोपीकडून देण्यात आलेली साक्ष रद्द ठरवली. कोर्टाने सांगितले की, आरोपी विरोधात सर्वच पुरावे उपलब्ध आहेत, त्यामुळे त्याला दोषी ठरवण्यात येत आहे. या आरोपीला शिक्षा मंगळवारी सुनावली जाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News