सावधान! हस्तमैथुन करत असाल तर होऊ शकतो डोळ्यांचा आजार?

यिनबझ टीम
Saturday, 15 February 2020

शरीर संबंध, पॉर्न, हस्तमैथून असे अनेक प्रकार आपण जितके होईल तितके खाजगी ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. त्यामुळे होतं इतकच की आपण त्यातल्या अनेक गोष्टींपासून दुर्लक्षित राहातो आणि काहीदा आपल्याकडून चुकीच्या गोष्टी घडून जातात.

शरीर संबंध, पॉर्न, हस्तमैथून असे अनेक प्रकार आपण जितके होईल तितके खाजगी ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. त्यामुळे होतं इतकच की आपण त्यातल्या अनेक गोष्टींपासून दुर्लक्षित राहातो आणि काहीदा आपल्याकडून चुकीच्या गोष्टी घडून जातात. त्यातच अनेक तरुणांची ही एक समज आहे की हस्तमैथून करणे म्हणजेच खरतर चुकीच आहे; मात्र तसं काहीही नसून शास्त्रज्ञांनी त्यावर काय मत मांडलय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

हस्तमैथुन

अनेक शास्त्रज्ञ सांगतात की हैस्तमैथुन करणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यावर कोणीही मोकळेपणाने जरी बोलत नसलं तरी सर्रास लोक हैस्तमैथुन करतात. हैस्तमैथुन करणे हे बहुतेकवेळा शरिरासाठी, आपल्या आरोग्यासाठी नेहमी चांगले असते, असेही काही शास्त्रज्ञांचं मत आहे, पण याचही एक प्रमाण असते, हेही मत शास्त्रज्ञ सांगायला विसरत नाहीत.

हस्तमैथुन

हैस्तमैथुनाबद्दलचे गैरसमज

हैस्तमैथुन बाबत अनेक तरुण तसेच वडीलधाऱ्या माणसांमध्ये अनेक गैरसमज असतात. आता हेच बघा ना; आम्ही काही तरुणांना हैस्तमैथुनाबाबत विचारलं तर त्यांच्या मते हैस्तमैथुन केल्याने आपल्या शरिराला खूप थकवा जाणवायला लागतो, शरिररातील स्नायु कमजोर पडतात, आपल्या डोळ्यांच्या तिक्ष्णतेवर परिणाम होतो, आपल्या भविष्यातल्या लैंगिक जिवनावर परिणाम पडू शकतो, इतकच नाही तर काही तरुणांच्या मते हैस्तमैथुनामुळे आपल्याला वेडसरपणा जाणवू शकतो, अनेक अवयवांच्या विकासात अडथळा निर्माण होऊ शकतो असे अनेक गैरसमज आजच्या तरुण पिढीत पसरले आहे.

हस्तमैथुन

गैरसमजांवरती शास्त्रज्ञ म्हणतात...

तुम्ही ज्यावेळी हैस्तमैथुन करता त्यावेळी एका मानसिक तणावातून मुक्त झालेले असता, यामुळे शरिरात इंडॉर्फिन हार्मोन्सची निर्मिती झालेली असते. ज्यामुळे आपल्याला आनंद जाणवत असतो. आपले मन खूप वेळ फ्रेश राहाते, यामुळे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो.

हस्तमैथुन

वर नमुद केलेले हस्तमैथुनाचे अनेक गैरसमज हे चुकीचे आहेत, पण आपण खूपदा हैस्तमैथुन करत असू  (म्हणजे दिवसातून दोनपेक्षा अधिकवेळा) तर भविष्यात आपल्या लैंगिक संबंधावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

हस्तमैथुन

आता दिवसातून किंवा आठवड्यातून कितीदा हस्तमैथुन करावं, याबाबत शास्त्रज्ञांनी कोणतीच माहिती अद्याप दिली नाही, मात्र एखाद्या आजारपणात आपण हस्तमैथुन केलं तर आपल्या शरिरावर त्याचे थोडेफार परिणाम दिसून येतील, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

हस्तमैथुन

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News