सावधान! कोरोनाग्रस्त पेशंट परत येतो म्हणून पळून गेला तो आलाच नाही

यिनबझ टीम
Friday, 13 March 2020

नालंदाचे सिव्हिल सर्जन रामसिंह म्हणाले की, जेव्हा पेशंटला रूग्णालयात दाखल करून रक्ताचे नमुने जमा होईपर्यंत वेगळ्या वॉर्डात थांबण्यास सांगितले गेले, तेव्हा तो गुरुवारी पुन्हा येतो म्हणून गेला ते परत आलाच नाही.

नालंदा - बिहारच्या बिहारशरीफमधील नालंदा हॉस्पिटलमध्ये एका कोरोनाग्रस्त व्यक्तीमुळे गोंधळ उडाला आहे. त्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लक्षणे असल्याचा दावा केला जात आहे. जेव्हा डॉक्टरांनी त्या व्यक्तीला दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये रेफर केले आणि त्याला तिथे जाण्यास सांगितले तेव्हा पीडित अचानक गायब झाला.

नालंदा जिल्ह्यातील बिंद पोलीस स्टेशन अंतर्गत नौरंगा येथे राहणाऱ्या गौतम कुमारने बुधवारी सकाळी डॉक्टरांना सांगितले की आपण दिल्ली येथे काम करतो आणि मार्च रोजी तो घरी परतला होता. या माणसाचा असा दावा आहे की तो दिल्लीहून परत आल्यापासून कोरोना विषाणूसारख्या लक्षणांनी ग्रस्त होता आणि ताप, कोरडा खोकला आणि घशात दुखत होते.

नालंदाचे सिव्हिल सर्जन रामसिंह म्हणाले की, जेव्हा गौतमला रूग्णालयात दाखल होण्यास आणि रक्ताचा नमुना गोळा होईपर्यंत आयसोलेशन वॉर्डात थांबण्यास सांगितले गेले, तेव्हा त्यांने पुन्हा येतो गुरूवारी तेथून निघून गेला. सर्जनने सांगितले की कुटुंबाच्या दबावाखाली गौतम बुधवारी संध्याकाळी सदर रुग्णालयात आला होतो.

यावेळी डॉक्टरांनी त्याची वर्धमान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (व्हीआयएमएस) येथे तपासणी केली. मात्र, संध्याकाळी सहा वाजता तेथे कोणताही रुग्ण आला नाही, असा दावा विम्सच्या उपअधीक्षक डॉ. बीबी सिन्हा यांनी केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News