'इतिहास प्राध्यापक' म्हणून करू शकता करिअर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020
  • इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही काळाची वैचारिक आवश्यकता आहे असं प्राध्यापक शिवाजीराव भोसले सांगायचे.इतिहास योग्य प्रकारे शिकवला गेला तरच येणारी भावी पिढी देशाचे उत्तम भविष्य घडवू शकते.

इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही काळाची वैचारिक आवश्यकता आहे असं प्राध्यापक शिवाजीराव भोसले सांगायचे.इतिहास योग्य प्रकारे शिकवला गेला तरच येणारी भावी पिढी देशाचे उत्तम भविष्य घडवू शकते. या विचारातून एक उत्तम इतिहास प्राध्यापकांची पिढी तयार होण्याची किती आवश्यकता आहे हे समजेल. प्राध्यापकासाठी एम ए (इतिहास) करून सेट किंवा नेट परीक्षा पास करावी लागते. पीएचडी असल्यास अधिक उत्तम.यामुळे भारताला उत्तमोत्तम इतिहास संशोधक आणि प्राध्यापक हवे आहेत. आणि त्यातूनच इतिहासातील एक उत्तम करिअर आणि विशेषतः इतर कुठल्याही करिअर पेक्षा राष्ट्राच्या निर्मितीसाठी अधिक महत्वाचे करिअर तुमच्या समोर उभे आहे

महाराष्ट्राला अतिशय प्राचीन आणि सुंदर इतिहास लाभला आहे. हा इतिहास काळाची धूळ झटकून जगासमोर येणे आत्यंतिक गरजेचे आहेच पण ती महाराष्ट्राची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अधिकाधिक मुलांनी राष्ट्रभक्तीच्या उद्देश्याने, महाराष्ट्र राज्याचे पांग फेडण्याच्या विचाराने, आणि जाज्वल्य इतिहास निर्माण केलेल्या युगप्रवर्तक महाराज आणि त्यांच्या निष्टावंत मराठ्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून या विषयाकडे गांभीर्याने पहिले पाहिजे.

अनेक ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमी, शिवभक्त गडकिल्ल्यांवर जाउन शासनाच्या नाकर्तेपणा साठी आणि मराठ्यांच्या इतिहासाप्रती असलेल्या कृतीहीनतेसाठी दोष देतात. यापेक्षा तुम्ही स्वतः या विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून शासनाच्या इतिहास विषयक आस्थापनांमध्ये का जात नाही? या मुलांची तळमळ प्रामाणिक आहे पण केवळ आंदोलने करून वात पाहण्यापेक्षा ती स्वतः निर्णयक्षम झाली तर महाराष्ट्राच्या इतिहासाला आलेली दैन्यावस्था निघून जाइल. आज मराठ्यांच्या इतिहास राष्ट्रीय पातळीवर योग्य प्रकारे शिकवला गेला, तर आमच्या पूर्वजांना, महाराजांना ती खरी आदरांजली थरेल. यासाठी मराठी इतिहासाचे प्राध्यापक निर्माण होणे गरजेचे आहे. उत्तमोत्तम पुरातत्वशास्त्रज्ञ निर्माण होणे गरजेचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News