'ऐतिहासिक लेखक' म्हणून करू शकता करिअर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

इतिहासासोबत मास कम्युनिकेशन वा जर्नालिझम या विषयामध्ये पदवी घेतल्यास माध्यमांच्या क्षेत्रातही अनेक संधी मिळू शकतात.मूलभूत ऐतिहासिक लिखाण करणाऱ्यांची बरीच वानवा सध्या दिसून येते. त्यामुळे हे क्षेत्रही करिअर करण्यासाठी उपलब्ध होऊ शकते.

केंद्र आणि राज्य शासनामार्फत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये इतिहास विषयावर बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. शिवाय मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्येही काही वर्णनात्मक प्रश्न विचारले जातात. इतिहासाच्या वाचनाने विविध प्रश्नांकडे आणि समस्यांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. इतर प्रश्न सोडवताना अशा व्यापक विचारसणीचा उपयोग उत्तरांचा दर्जा आणि वस्तुनिष्ठता वाढवण्यासाठी होतो. इतिहासविषयक ग्रंथ आणि पुस्तके मुबलक प्रमाणावर उपलब्ध असल्याने अभ्यासासाठी दर्जेदार साहित्य प्राप्त करण्यासाठी खूप वेळ खर्च करावा लागत नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News