"गेस्ट लेक्चरर" म्हणून करू शकता करिअर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020
  • अनेक कॉलेजमध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून तरुणांना बोलविण्यात येते. त्यानुसार विविध कॉलेजमधील मुलांना शिकविण्याची संधी मिळते.

असंख्य इंजिनीअर, आयआयटीयन्स व डॉक्टर्स आज अकरावी-बारावीच्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेत आहेत. या साऱ्यांकडे अचंब्याने पाहणारे हजारो ज्युनिअर व सीनिअर कॉलेजचे सर वा प्राध्यापक आहेत. अशीच स्थिती सीए, सीएस, सीडब्ल्यूएच्या प्रवेश परीक्षांची आहे; यामुळेच गेस्ट लेक्चरर म्हणून करिअरची संधी पुढे येत आहे.  

अनेक कॉलेजमध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून तरुणांना बोलविण्यात येते. त्यानुसार विविध कॉलेजमधील मुलांना शिकविण्याची संधी मिळते. यात विविध फॅकल्टीद्वारे विविध विषय शिकविण्याची संधी मिळते. त्यामुळे पदवीनंतर देखील तरुण महाविद्यालयात एकदा विषय शिकविण्यासाठी जाऊ शकतात. 

दरम्यान काई कॉलेजमधून चांगले मानधन देखील देण्यात येते. त्यामुळे शिकता-शिकता किंवा नोकरी करताना गेस्ट लेक्चरर म्हणून जॉब करता येऊ शकतो.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News