कोरोना नंतरचे करिअर

संयोगिता पाटील
Thursday, 22 October 2020

करिअरच्या संधी खूप आहेत. काही लोकांच्या नोकऱ्या गेलेत, तर काही लोक मृत्युमुखी झाल्यामुळे त्यांच्या जागा रिकाम्या झाल्या आहेत. तसेच आरोग्यखाते, रेल्वेमध्ये काही जागा उपलब्ध आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने पाहायचं झाल तर खूपसे उधोगधंदे बंद पडल्याने नव्या उद्योगांना संधी आहे.

कोरोना नंतरचे करिअर

- संयोगिता पाटील, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रम १६ फेब्रुवारी २०२० रोजी शिकवून पूर्ण झाला होता. तोंडी परीक्षाही घेतली गेली होती. आता परीक्षेचे वेळापत्रक हाती पडलेले होते व सर्व विद्यार्थांमध्ये गांभीर्याने अभ्यासाचे वातावरण तयार झाले होते. इतक्यात कॉलेजच्या सूचना फलकावरती सूचना झळकली. पुढील सुचनेपर्यंत महाविद्यालय बंद राहणार असे त्यात लिहिले होते. आमचे महाविद्यालय काय तर अखंड देशातील महाविद्यालय बंद झाल्याचे समजले. कारण काय ? तर कोरोना म्हणजेच कोव्हिड-१९ (को म्हणजे corona, व्हि म्हणजे virus आणि ड म्हणजे disease).

तर हा कोरोना विषाणूंच्या संच्यातला नवीन विषाणू प्रकार आहे, जो चीनच्या वूहान प्रांतातून वटवाघुळाच्या माध्यमातून मानवात प्रवेश केला. वैश्विक महामारीच स्वरूप धारण करून बसलेला आहे आणि बलाढ्य तंत्रण्यानाने विकसित असलेले देश या विषानुसमोर गुडघे टेकलेले आपणाला दिसत आहेत.कोरोनामुळे सुरळीत चाललेले जन – जीवन विस्कळीत झाल. कोरोनावर उपाय म्हणून २५ मार्चला १ दिवसाचं लॉकडाऊन त्यानंतर २१ दिवस असे लॉकडाऊनचे दिवस वाढतच गेले. लोक घराच्या चार भिंतींमध्ये कोंडले गेले. व्यवसाय, उद्योगधंदे, कारखाने, वाहतूक, व्यवहार, शाळा–महाविद्यालये सर्वकाही बंद पडलं.

कोरोनाची दहशत निर्माण झाली. किती दिवस घरात बसणार हा प्रश्न सताऊ लागला. जीवनावश्यक वस्तू व वैद्यकीय सोईसुविधा सोडता सर्व देश बंद राहणार अशा सूचना देशाच्या प्रशासकीय यंत्रणेने घोषित केल्या. परीक्षा रद्द झाल्यात, आता सुट्याच आहेत अशा बातम्या येऊ लागल्या. आमच्या घरातील लहान मुलांच्या आनंदाला परिसीमा नव्हत्या. सुरुवातीला मला देखील शाळेच्या परीक्षा रद्द झाल्यात म्हटल्यावर महाविद्यालयाच्या देखील होतील असा सुखद दिलासा वाटत होता. परंतु जसे दिवस पुढे जात होते तसे विषाणूची अधिक माहिती मला मिळत होती. चीन मधून सुरु झालेला हा विषाणू जगभरात हजारो लोकांचे बळी घेतोय व आपल्या देशातील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. ही स्थिती मनाला अत्यंत अस्वस्थ करणारी होती.

आता संपूर्ण जगाचे किंवा मानवजातीचे कोरोना नावाच्या विषानुशी एक युद्ध चालू झालेले आहे हे लक्ष्यात आले, पण हा मानव निसर्गापुढे हतबल होतोय. काही महिन्यानंतर आता सगळ हळूहळू शिथिल होत आहे. बस, रेल्वे, जीम चालू होत आहेत. पण खूप जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. शिक्षणसंस्था आज देखील बंद आहेत. सामाजिक कोंडी मुळे भावनिक कोंडी निर्माण होत आहे. सार्वजनिक कार्यक्रम-लग्न, बारसे बंद झाली आहेत.

खुपसारे उद्योगधंदे बंद पडले आहेत. मोठे उधोगधंदे चालूच आहेत, ज्यांच्याकडे भांडवल आहे, स्थावर-मालमत्ता असणारे उधोगधंदे जरी बंद झाले असले तरी ते नव्याने चालू झाले आहेत. पण फेरीवाले किवा ज्यांच पोट हातावर चालणार आहे ज्यात स्टॉलवाले असतील, फेरीवाले ज्याला लघु उदुधोजक म्हणतो किंवा रेल्वे – बसमध्ये चॉकलेट, गोळ्या घेऊन फिरणारे लोक, चणे – फुटाने विकणारे लोक यांच्यावर बेकारीची, दारिद्र्याची कुऱ्हाड आल्यामुळे ते लोक हतबल झाले आहेत. कोरोना नंतरच्या स्थितीमध्ये या लोकांना काम मिळन अत्यंत गरजेच आहे. या लोकांचे पुन्हा उधोगधंदे उभे राहाण हि काळाची कठीण कसोटी आहे. काही तरुणांवर खूप मोठ संकट आल आहे, कारण त्यांच्या नोकऱ्या गेलेत त्यामुळे ते तरुण नोकरीच्या  शोधात आहेत. शाळा – महाविद्यालये अद्यापही बंद आहेत. परीक्षा घेण्याचे अनेक प्रश्न उद्भवले आहेत.

ही परिस्थिती बदलणे अवघड झाल आहे, कोरोना नंतरची परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. आरोग्यविषयक प्रश्न महत्वाचे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषयी मांडलेले प्रश्न आणि आता त्यांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेण अत्यंत गरजेचे आहे. आता कोरोना काही प्रमाणात कमी येत आहे, कोरोनाच्या या काळानंतर सगळ्यात महत्वाचा झालेला बदल म्हणजे – भीतीच सावट नष्ट झाल आहे. कोरोनाला आपणाला सामोरे जायचा आहे, काहीही झाल तरी. कोरोना नंतरची सामाजिक, आर्थिक, स्थिती बदलत आहे, अस मला जाणवत आहे. अजूनही शिक्षण-व्यवस्थ्येच्या बाबतीत शंका आहे, शिक्षण व्यवस्था अजूनही सुरु नाहीत. पालक आपल्या मुलांना अजून शाळेला सोडायला तयार नाहीत.

पहिली पासूनच्या मुलांना शाळेला सोडायला पालकांच्या मनात भीती आहे. जोपर्यंत कोरोनाचा संपूर्ण नायनाट होणार नाही, तोपर्यंत हि परिस्थिती बदलणार नाही अस मला वाटत.मुख्यमंत्री हे अनेक प्रकारच्या घोषणा करत आहेत. मुख्यमंत्री असे म्हणतात कि जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत शैक्षणिक सत्र केल पाहिजे, अजून  यु.जी.सी. ने मान्यता नाही दिली. कोरोनाच्या बाबतीत लोक सक्षम बनत आहेत, परिस्थिती पूर्व पदावर येत आहे, कोरोनाची मोठी लढाई आहे. हि लढाई निसर्गाची मानवासोबत आहे आणि मानवाची मानवासोबत झाली आहे. आण्विक युद्धासारख हे एक छुप युद्ध आहे.

कोरोनाच्या बाबतीत जाणवलेला महत्वाचा मुद्दा म्हणजे हा फक्त मानवामध्ये पसरलेला आहे. पशू-पक्षी, प्राण्यांना याचा प्रादुर्भाव नाही झाला. ते मुक्तपणे फिरत आहेत.कोरोनामुळे मानवाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्या ऑनलाईन साधनांवर आजपर्यंत टीका करत होतो व्हॉटसॅप, फेसबुक, ट्वीटर, झूम इ. त्याच साधनांवर आपण अवलंबून राहत आहोत, हा सगळ्यात मोठा झालेला बदल आहे.हॉस्पिटल, डॉक्टर, नर्स हे सर्वजण आरोग्य – व्यवस्थेचा कणा आहे. हि सर्व सक्षम यंत्रणा आहे, आज ती सुद्धा हतबल झाली आहे. माणसाचा भरपूर पैसा खर्च झाला. हि परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पोलिसांची दहशत होती, ती आता हळूहळू नाहीशी होत आहे. कोरोना हि नैसर्गिक आपत्ती आहे.कोविड सेंटर उभी राहत आहेत.

कोरोना जरी गेला तरी १ – २ वर्षे हि भीती राहणार आहे; कोरोना नंतरची २ वर्षे हि आरोग्या – विषयक गोष्टींबद्दल झगडण्याची वर्षे आहेत. भविष्यामध्ये जरी कोरोनाची लस सापडली तरीसुद्धा ती १००% यशस्वी असेल अस सांगता येत नाही. प्लेग, स्वाइन फ्लू, कोरोना येतो, पण या सर्व रोगराईंवर माणूस नव्याने उभारतो.नोकरदार वर्ग, विध्यार्थी वर्ग, व्यापारी वर्ग, समाजकार्यात मध्ये काम करणारे सर्वजण पुन्हा जोमाने उभे राहतील असा मला आशावाद वाटतो. निश्चितच कोरोना नंतरची परिस्थिती बदलणार आहे.

करिअरच्या संधी खूप आहेत. काही लोकांच्या नोकऱ्या गेलेत, तर काही लोक मृत्युमुखी झाल्यामुळे त्यांच्या जागा रिकाम्या झाल्या आहेत. तसेच आरोग्यखाते, रेल्वेमध्ये काही जागा उपलब्ध आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने पाहायचं झाल तर खूपसे उधोगधंदे बंद पडल्याने नव्या उद्योगांना संधी आहे. पूर्वी भाजी-मार्केट मध्येच नियम आणि कायदा यांचं पालन करून भाजी विकली जायची. आता स्टॉलवर तसेच मोटर- सायकलवरून घरोघरी जाऊन भाजी विकली जाते.

भविष्यात परिस्थिती नाही बदलली तर सिलेंडर प्रमाणे भाजी आणि कपडे तसेच जीवनावश्यक सर्व वस्तू घरपोच मिळतील यात शंका नाही. बझार, मॉलवाले यांचे व्यवसाय जोमाने चालू आहेत.कोरोनामुळे खुपसारे शैक्षणिक बदल आपणास पहावयाला मिळतात. ऑनलाईन शिक्षण आपण नाकारत होतो आणि आता त्याशिवाय पर्याय नाही.

माणूस जर अॅडव्हान्स नाही झाला तर तो मागे पडणार हे मात्र नक्की. तसेच स्वच्छतेच्या बाबतीत माणूस नक्कीच सुधरला आहे. बाजारपेठा, व्यवसाय, शिक्षण-व्यवस्था यामध्ये आमूलाग्र बदल पहावयास मिळतात. कोरोना नंतरची मंदी २ वर्षे चालेल. कोरोना-मुळे, कोरोना-नंतर परदेशात नोकरी मिळण्याची संधी तरुण वर्गाला आहे. आर्थिक उलाढालीच्या बाबतीत फार मोठा बदल होणार आहे. माणूस कोरोना-नंतर गतिशील, प्रगतीशील होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News