'प्रोफेशनल' अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना अशी घ्या काळजी...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 31 December 2019

१२ वी नंतर B.A. व B.Com व काही B.Sc. कोर्सेस सोडून कोणत्याही पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल, तर आता प्रवेश परीक्षांव्दारे प्रवेश घ्यावा लागतो. मेडिकल, इंजिनिअरिंग व फार्मा हे सर्वसाधारणपणे माहिती असणारे १२ वी सायन्स नंतरचे पदवी अभ्यासक्रम आहेत

१२ वी नंतर B.A. व B.Com व काही B.Sc. कोर्सेस सोडून कोणत्याही पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल, तर आता प्रवेश परीक्षांव्दारे प्रवेश घ्यावा लागतो. मेडिकल, इंजिनिअरिंग व फार्मा हे सर्वसाधारणपणे माहिती असणारे १२ वी सायन्स नंतरचे पदवी अभ्यासक्रम आहेत. याचबरोबर आर्टस्‌, सायन्स, कॉमर्स या तिनही शाखांतून १२ वी नंतर पारंपरिक B.A,B.Com,B.Sc. कोर्सेस सोडून अनेक विविध प्रोफेशनल कोर्सेस आज उपलब्ध आहेत. उदा. हॉटेल मॅनेजमेंट, एल एल बी, इव्हेंट मॅनेजमेंट, डिझाइनिंगमध्ये इंटिरीअर, फॅशन, प्रॉडक्‍ट, ज्वेलरी, ऑटोमोबाइल इत्यादी. कृषीक्षेत्रात डेअरी टेक्‍नॉलॉजी, शुगर टेक्‍नॉलॉजी, फूड टेक्‍नॉलॉजी इत्यादी यातील काही अभ्यासक्रम हे आर्टस, सायन्स, कॉमर्स तिनही शाखांतील मुलांसाठी आहेत. 

यासारख्या प्रोफेशनल कोर्सेस मधून देश-परदेशात नोकरी तसेच स्वतःचा व्यवसाय अशा दुहेरी करिअर संधी उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्‍वाचे म्हणजे आज आर्टस्‌, कॉमर्सची मुले देखील IIT पदवी घेऊ शकतात. या सगळ्या अभ्यासक्रमांचे प्रवेश हे निर्धारित प्रवेश परीक्षांव्दारे दिले जातात. अशा प्रवेश परीक्षांचे अर्ज डिसेंबर-जानेवारी या महिन्यात चालू होतात. म्हणून एक-एक प्रवेश परीक्षेची माहिती आवश्‍यक आहे. प्रवेश परीक्षेचे स्वरूप, फॉर्म भरण्याच्या तारखा या परीक्षेव्दारे उपलब्ध होणारे अभ्यासक्रम व त्याव्दारे मिळणा-या करिअर संधी अशी माहिती मिळेल. 

आजच्या लेखात NEET - २०२०  याबाबत माहिती घेऊया. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मेडिकल व संबंधित अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यासाठी सविस्तर माहिती पुढे दिली आहे. 
या परीक्षेव्दारे खालील अभ्यासक्रमांना अखिल भारतीय पातळीवर प्रवेश दिला जातो.

१) MBBS (बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी), २) BDS (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी), ३) BAMS (बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी)
४) BHMS (बॅचलर ऑफ होमिपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी), ५) BUMS (बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी), ६) BPT (बॅचलर ऑफ फिजिओथेरपी)
७) B. VSc (बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स), ८) BNYS (बॅचलर ऑफ नॅचरोपथी अँड योगा सायन्सेस), ९) BSMS (बॅचलर ऑफ सिद्धा मेडिसिन अँड सर्जरी)
१०) B. Sc. Nursing ( बॅचलर ऑफ सायन्य इन नर्सिग), ११) BOT (बॅचलर ऑफ ऑफ्युपेशनल थेरपी), १२) BASLP (बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लॅंग्वेज पॅथॉलॉजी). ही परीक्षा फिजिक्‍स, केमेस्ट्री व बायोलॉजी मिळून ७२० गुणांची असते. एकूण प्रश्नसंख्या १८० असते. प्रत्येक बरोबर उत्तराला ४ गुण व चुकीच्या उत्तराला वजा १ गुण मिळतो.

परीक्षेची वेळ ३ तास असून सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. त्यातील एक पर्याय बरोबर असून OMR उत्तरपत्रिकेत बरोबर उत्तराच्या समोरचा गोल भरीव करायचा असतो. परीक्षा ऑफ लाईन म्हणजे पेन-पेपर बेस्ड असते. फिजिक्‍सचे ४५, केमेस्ट्रीचे ४५ व बायोलॉजीचे ९० प्रश्न सोडवायचे असतात. १२ वी सायन्स परीक्षेला बसणारे व उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देऊ शकतात. वय वर्षे १७ ते २५ या वयोगटांत किती वेळा परीक्षा द्यायची याला बंधन नाही. १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर ही परीक्षा आधारित आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News