दहावी, बारावीच्या टॉप विद्यार्थ्यांना सरकारकडून कार गिफ्ट; कशी आहे योजना?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 25 September 2020

दहावी-बारावीतील टॉपर विद्यार्थ्यांना मारुती 800 हन्ड्रेड कार गिफ्ट देऊन गौरव करण्यात आला.

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना, अभिनव उपक्रम सरकार राबवत आहे. असाच एक अनेखा उपक्रम झारखंड सरकारने सुरु केला. दहावी-बारावीतील टॉपर विद्यार्थ्यांना मारुती 800 हन्ड्रेड कार गिफ्ट देऊन गौरव करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे, असे मत झारखंड राज्याचे शिक्षणमंत्री जगन्नाथ महतो यांनी व्यक्त केले. झारखंड अॅकॉडेमीक काऊंसील (JAC) बोर्डात टॉप येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून कार दिली जाईल अशी घोषणा महतो यांनी केली होती. त्या घोषणेची परिपुर्ती झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक स्वर्गीय विनोद बिहारी महतो यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आली.

 

राज्याचे शिक्षणमंत्री जगन्नाथ महतो यांनी आपल्या ट्विटर हँडल करून अधिकृत माहिती दिली, 'परमपूज्य बिनोद बिहारी महतो जी यांच्या जयंतीनिमित्त विधानसभा अध्यक्ष श्री रवींद्रनाथ महतो यांच्या हस्ते दहावीतील टॉपर मनीष कटियार आणि बारावीतील टॉपर अमित कुमा यांना प्रोत्साहन म्हणून मारुती 800 हन्ड्रेड कारची चावी देण्यात आली, असे ट्विट करुन महतो यांनी सांगितले.

कशी आहे योजना

यापूर्वीही अनेक राज्यांनी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहण देण्यासाठी पारितोषिके दिली आहेत. आसाम राज्यांनी 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाराम बोरुआ पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे स्वरुप वीस हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह आहे. प्रज्ञा भारती योजनेद्वारे बारावी बोर्डात प्रथम येणाऱ्या 22 हजार विद्यार्थ्यांना स्कुटी दिली जाते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News