पु. ल. देशपांडे अकादमी मधील कलादानलाही परवडेना... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

मागील वर्षी जून व जुलै महिन्यांत एकही आरक्षण झाले नाही. # पु. ल. देशपांडे कला अकादमीतील कलादालनाचे आरक्षण होत नाही; त्यामुळे उत्पन्न कमी मिळते.

मुंबई : प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या कलादालनाला मिळणारा प्रतिसाद अत्यल्पच आहे. प्रभादेवीसारख्या मोक्‍याच्या ठिकाणी असूनही या प्रशस्त कलादालनाचे बुकिंग होत नाही. त्यामुळे अकादमीला तोटा सहन करावा लागतो. मागील वर्षी कलादालनात केवळ १४ खासगी प्रदर्शने झाल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. 

प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे कला अकादमीतील रवींद्र नाट्य मंदिर, प्रदर्शन सभागृह, मिनी थिएटर यांचे अनेक महिन्यांचे आरक्षण झालेले असते. कलादालनाला मात्र बुकिंग मिळत नाही; महिन्याला केवळ दोन ते तीन प्रदर्शने होतात. मागील वर्षी काही महिने कलादालनाचे बुकिंगच झाले नव्हते, असे माहिती अधिकार अर्जाच्या उत्तरातून उघड झाले. 

मुंबईतील इतर कलादालने प्रदर्शनाच्या किमान तीन महिने ते वर्षभर आधी आरक्षित केली जातात. वरळी येथील नेहरू आर्ट गॅलरी, काळा घोडा येथील जहांगीर कलादालन, अंधेरी येथील आर्ट गॅलरी या ठिकाणी सतत प्रदर्शने सुरू असतात. दादर आणि प्रभादेवी ही रेल्वेस्थानके व रस्त्यांनीही प्रभादेवीला पोहोचणे सोपे आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमीत नेहमीच कार्यक्रम होत असल्याने रसिकांचा राबता असतो; मात्र कलादालन आरक्षित होत नाही.# उत्पन्नात घट

पु. ल. देशपांडे कला अकादमीतील कलादालनाचे भाडे दिवसाला ६५०० रुपये आहे. हे कलादालन २०१७ मध्ये ४५ दिवस आरक्षित होते. त्यानंतर २०१८ मध्ये ६६ दिवस आणि २०१९ मध्ये तर केवळ ४१ दिवस आरक्षित होते. मागील वर्षी जून व जुलै महिन्यांत एकही आरक्षण झाले नाही. # पु. ल. देशपांडे कला अकादमीतील कलादालनाचे आरक्षण होत नाही; त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. म्हणून आम्ही कलादालनाचा अभ्यास केला. येथील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडे चार लाख रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला आहे. 
- बिभीषण चवरे, प्रभारी संचालक, पु. ल. देशपांडे कला अकादमी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News