जालना विधानसभेच्या मैदानात हे उमेदवार लढण्यासाठी सज्ज

भास्कर बलखंडे 
Friday, 7 June 2019
  • जालना लोकसभा मतदार संघात जालना, बदनापूर, भोकरदन परतूर आणि घनसावंगी या पाच विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो.
  • या मतदार संघात 32 टक्के मराठा, 20 टक्के दलित, 22 टक्के मुस्लिम 6 टक्के उत्तरभारतीय यांच्यासह धनगर, कुणबी, जैन, गुजराती तर अन्य समाज 20 टक्के आहे

जालना: भाजप-शिवसेना यांच्यातील युती आणि कॅाग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील आघाडीचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी झाल्याने लोकसभेसह येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जालना जिल्ह्यातील समिकरणे बदलणार आहेत.
लोकसभेच्या निमित्ताने भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार विधानसभा लढविण्यास इच्छुक असलेल्यांनी महिनाभरापासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.

स्थानिक स्वराज्य संस्थामधील सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन जनमानसातील आपली प्रतिमा बळकट केली. विधानसभेसाठी या इच्छुकांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. तर विद्यमान आमदारांनी या निवडणुकीतही आपणच वरचढ राहण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. असे असले तरीही भाजप-सेनेत युती तर दोन्ही कॅाग्रेस मध्ये आघाडी झाल्याने पूर्वीच्या जागा सोडवून घेताना संघर्षाची ठिणगी पेटू शकते. 

पाच विधानसभेचा समावेश
जालना लोकसभा मतदार संघात जालना, बदनापूर, भोकरदन परतूर आणि घनसावंगी या पाच विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो. या मतदार संघात 32 टक्के मराठा, 20 टक्के दलित, 22 टक्के मुस्लिम 6 टक्के उत्तरभारतीय यांच्यासह धनगर, कुणबी, जैन, गुजराती तर अन्य समाज 20 टक्के आहे. या मतदार संघात विजयावर प्रभाव पाडणाऱ्या मराठा, मुस्लिम आणि दलित या तीन प्रमुख जाती आहेत. 

जालना विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वतीने राज्यमंत्री अर्जुन खोतकर तर कॅाग्रेसतर्फे माजी आमदार कैलास गोरंट्याल प्रमुख दावेदार आहेत. गेल्या निवडणुकीत श्री. खोतकर यांनी कॅॉग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला होता. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, हे ही इच्छुक मानले जातात. ऐनवेळी श्री. अंबेकर यांनाही निवडणुकीत उतरविल्या जाऊ शकते. श्री.खोतकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त संपूर्ण मतदार संघातील विविध पदाधिकार्यांच्या भेटीगाठी घेतल्या. याचाही मोठा फायदा त्याना निवडणुकीत मिळू शकतो. कॅाग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीच्या वतीने माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर अब्दुल रशिद हे राष्ट्रवादी कॉग्रेसकडून दावेदार असू शकतात. बहुजन वंचित आघाडीच्या वतीने दिपक डोके यांना रिंगणात उतरविल्या जाऊ शकते.

राजकीय संघर्षाचे संकेत.. 

  • आघाडी युती कायम राहिल्यास जागा वाटपावरून संघर्ष 
  • तिकिट न मिळाल्याने इच्छुकांची हिरमोड होणार
  • गेल्या निवडणुकीतील भाजपच्या जागेवर शिवसेना दावा करणार
  • कॅांग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील इच्छुकातही वादाची शक्यता

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News