बिग बॉसमधील 'हा' स्पर्धक करणार सनी लिओनीसोबत रोमान्स 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 January 2020
  • बिग बॉसचा १३ वा सिजन चर्चेत राहिला तो विशेष कारणांमुळे..!

मुंबई : बिग बॉसचे प्रत्येक सिजन मोठ्या प्रमाणात गाजले. त्याला प्रेक्षकांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. बिग बॉसचा १३ वा सिजन चर्चेत राहिला तो विशेष कारणांमुळे..! असीम रियाज आणि सिद्धार्थ शुक्ला हे तर केंद्रस्थानी होते.

असीमची तर या शोच्या माध्यमातून एक नवी ओळख निर्माण झाली. त्या माध्यमातून असीमचा मोठा चाहतावर्ग झाला आहे. यामध्ये आणखी भर पडणार आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर असीम सनी लिओनीसोबत एका चित्रपटात काम करणार आहे.  

फिल्मीबीटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, एक मोठं शूटिंग होणार आहे, त्यामध्ये असीम सनी लिओनीसोबत रोमान्स करताना पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट असीम आणि सनीला एका चित्रपटात सोबत घेऊन काम करणार आहेत. अजून या चित्रपटाची कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये. तसेच याबाबत सनी लिओनीने कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केली नाही. 

त्यामुळे पुढील वर्षात सनी लिओनीसोबत असीम दिसणार की नाही, हे पाहून महत्त्वाचं ठरणार  आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News