इंडीयन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनची प्रवेश परीक्षा रद्द; असा मिळणार प्रवेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
  • दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेणे शक्य नाही. यावर पर्याय म्हणून गुणवत्तेवर प्रवेश दिला जाणार आहे.

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे इंडीयन इंस्टीट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनची (IIMC) प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली. आता विद्यार्थ्यांना मर्कांवर थेट प्रवेश  दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश फार्म भरल्यानंतर मीरीट लिस्ट तयार केली जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल अशी माहिती आयआयएमसी प्रशासनाने दिली. दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेणे शक्य नाही. यावर पर्याय म्हणून गुणवत्तेवर प्रवेश दिला जाणार आहे त्यासाठी नाव नोंदणी सुरु झाली.  

प्रवेश प्रक्रीया

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या आठ कोर्ससाठी प्रवेश प्रक्रीया सुरु होणार आहे. दहावी, बारावी आणि पदवीच्या मार्कांवर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यांनुसार उमेदवारांची ऑनलाईन मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीचे मार्क आणि अभ्यासक्रमाचे मार्क एकत्र करुन निवड यादी तयार केली जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. कोरोनामुळे सध्या ऑनलाईन क्लासेस सुरु केली जातील. प्रत्यक्ष क्लास केव्हा सुरु होणार आहे याची माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना पुर्वी नाव नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, नवीन विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी सुरु आहे. अर्ज करताना दोन मिनीटाचा व्हिडीओ किंवा दोनशे शब्दाचा एक परिच्छेद लिहून पाठवायचा आहे. अभ्यासक्रमाला का प्रवेश घेत आहे? याची माहिती परिच्छेदात लिहायची आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दू, दुरचित्रवाणी, रेडीओ, जाहीरात आणि जनसंपर्क हे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत

नाव नोंदणी: 

उर्दू, ओडीसा, मल्ल्याळम, मराठी या चार प्रादेशीक भाषांसाठी नाव नोंदणी सुरु आहे. १४ ऑगस्ट नोंदणी अंतिम तारीख आहे. त्यापु्र्वी उमेदवारांनी अर्ज करावा.  अर्ज भरलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी ३१ ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर ३ सप्टेंबरला मुलाखत होईल आणि १० सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेला अर्ज भरुन पाठवायचा आहे.

अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा :

संपुर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News