पदवी नंतर आता सर्व पदविका परीक्षा रद्द; BTE बोर्डाचा महत्त्वपुर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020

ज्या विद्यार्थ्यांना यंदाच्या सेमीस्टर मध्ये सुधारणा करायची आहे त्यांना भविष्यात संधी दिली जाणार आहे. भविष्यात जेव्हा परीक्षा घेतली जाईल केव्हा विद्यार्थ्यांना मागील सेमिस्टची परीक्षा देता येईल.

नवी दिल्ली : पदवी परीक्षेनंतर आता पदविका (डिप्लोमा) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बोर्ड ऑफ टेक्नीकल एज्युकेशन (BTE) बोर्डाने घेतला. देशात दिवसेंदिवस कोविड-१९ विषाणूचा संसर्ग वाढत आहे, अशा परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही, त्यामुळे इंटरमेडीएट आणि सर्व सेमिस्टर परीक्षा रद्द करण्यात आल्या. या सेमिस्टरचे मुल्यांकन मागील सेमिस्टरमध्ये मिळालेल्या मार्कांवर केले जाणार आहे. सर्व सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचे आंतरीक मुल्यांकन करुन ५० टक्के क्रेडीट आणि विद्यार्थ्यांची दिलेल्या परफार्मन्सवर ५० टक्के असे एकुण १०० मार्कांचे गुण दिले जाणार आहे, अशी माहिती बोर्ड ऑफ टेक्नीलकल एज्युकेशन प्रसासनाकडून देण्यात आली.

ज्या विद्यार्थ्यांना यंदाच्या सेमीस्टर मध्ये सुधारणा करायची आहे त्यांना भविष्यात संधी दिली जाणार आहे. भविष्यात जेव्हा परीक्षा घेतली जाईल केव्हा विद्यार्थ्यांना मागील सेमिस्टची परीक्षा देता येईल. ज्या विद्यार्थ्यांना पदविका कालावधी संपला आहे, मात्र त्यांना एखाद्या विषय़ात कमी मार्क मिळाले तर पु्न्हा अतिरिक्त वेळ देऊन परीक्षा आयोजिक केली जाईल, असे बोर्डाने सांगितले. ज्या विद्यार्थ्यांचे सेमिस्टर परीक्षेत काही विषय राहिले आहेत. मात्र, त्यांच्या अभ्यासक्रमाचा कालावधी संपला आहे. अशा विद्यार्थ्यांना सेमिस्टर परीक्षा देण्यासाठी एक वर्ष कालावधी वाढवून मिळणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता मिटली, असे बोर्डाच्या एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली. 

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन दिल्ली सरकारने या पुर्वीच पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता पदविका परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केली. त्यामुळे कोरोना काळात विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल यावर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News