दिवसेंदिवस मोबाईलचे नवे तंत्रज्ञान विकसीत होत आहे, त्यामुळे जुने मोबाईल विकून नवीन मोबाईल घेण्याकडे तरुणाईचा कल आहे. अनेक वेळा जुन्या मोबाईलला एक्सचेंज ऑफरमध्ये चांगला भाव मिळतो. तर काही वेळा जुन्या मोबाईलला किंमत मिळत नाही, त्यामुळे जुन्या मोबाईल विकणे युजर्स परवडत नाही. जुन्या मोबाईलचे अनेक उपयोग करता येतात, हे उपयोग करुन ऑनलाईन शिक्षण, घराची सजावट, संरक्षण करता येते. जाणून घेऊया जुन्या मोबाईलचे विविध उपयोग कसे करावे.
डिजिटल फोटो फ्रेम
घरामध्ये फोटो फ्रेम लावण्याची प्रत्येकाला हौस असते, टॉबलेट किंवा मोबाईलच्या स्किनवर वेगवेगळे वॉलपेपर ठेवून डिजिटल फोटो फ्रेम बनवता येते. रंगीबेरंगी भिंती, टेबलवर डिजिटल फोटो फ्रेम ठेवून सुंदर घर बनवता येते. महत्त्वाचे म्हणजे फ्रेम मधले फोटो दररोज बदलता येतात. त्यामुळे घराला एक आधुनिक रूप येते. युजर्सना आवडणारे फोटो जुन्या टॅबलेट आणि स्मार्टफोनमध्ये सेव्ह करावे आणि आकर्षक फोटो फ्रेम बनवावा, अशाप्रकारे जुन्या मोबाईलचा वापर करता येतो.
ऑनलाइन एज्युकेशन
आधुनिक जगात शिक्षण पद्धती बदलत आहे, ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला आहे. वेगवेगळे कोर्सेस, वेबिनार ऑनलाइन एज्युकेशनच्या माध्यमातून घेतले जात आहेत. त्यासाठी मोबाईल, टॉबलेट किंवा लॅपटॉप असणे गरजेचे आहे, जुन्या मोबाईलचा उपयोग ऑनलाइन एज्युकेशनसाठी करता येतो. शिक्षणासाठी लागणारे काही ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करुन ठेवले तर ऑनलाइन एज्युकेशनसाठी उपयोग होतो, अशाप्रकारे महत्त्वपूर्ण कामासाठी जुन्या मोबाईलचा वापर करता येतो
ई- लायब्ररी
'पुस्तक हे मानवाच मस्तक ठिकाण्यावर आणण्याच काम करतं' अनेकांना पुस्तक वाचनाची आवड असते, विविध पुस्तकांचे ऑनलाइन पीडीएफ फॉरमॅटमध्ये् डाऊनलोड करून जन्या मोबाईनमध्ये ई- लायब्ररी तयार करता येते. आणि वेळ मिळेल तेव्हा वाचता येतो. प्ले स्टोरवर ई-बुक डाऊनलोड करण्याचे विविध अँप्स आहेत, त्यांचा वापर करुन वेगवेगळी पुस्तके सेव्ह करुन ठेवता येतात आणि मस्तपैकी ई लायब्ररी तयार करता येते.
हार्डडिस्क म्हणून वापर
फोटो, व्हिडिओ, अँप्स, गॅझेट साठवून ठेवण्यासाठी तरुणाई मोठ्या क्षमतेचे मोबाईल खरेदी करत असते मात्र, ते मोबाईल खराब झाल्यानंतर विकण्याच्या मनस्थितीत असते. अशा जुन्या मोबाईलचा वापर हार्डडिस्क म्हणून करता येतो. जुन्या मोबाईलमध्ये महत्त्वाचे फोटो, व्हिडिओ, माहिती, फाईल्स साठवून ठेवता येतात. जेव्हा गरज लागले तेव्हा पुन्हा हार्डडिस्क सारखा वापर कारता येते.
कॅमेऱ्याचा वापर सिक्युरिटीसाठी
घराबाहेर जाताना अनेकदा लहान मुलांना घरांमध्ये सोडून जावे लागते, अशावेळी मुलांवर नजर ठेवण्यासाठी मोबाईल कॅमेऱ्याचा वापर सिक्युरिटी सारखा करता येतो. मोबाईलचा कॉमेरा ऑन करुन ठेवल्यास घरातील सर्व हालचाली पाहता येतात. त्याचबरोबर मॉनिटरी स्क्रीन सारखा मोबाईलचा उपयोग करता येतो. त्यामुळे घराचे संरक्षण होते. जुन्या मोबाईलचे असे विविध उपयोग आहेत.