ई-पास बंद केलातर हे होऊ शकतं ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020

ई-पास बंद केलातर हे होऊ शकतं ?

ई-पास बंद केलातर हे होऊ शकतं ?

महाराष्ट्र - राज्यात कोरोनाची स्थिती अद्याप आटोक्यात आलेली नाही, अशा परिस्थीतीत ई-पास बंद केला तर कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आणखी काही दिवस ई-पास असणं गरजेचं आहे. तसेच ई-पास बंद करण्याचा सरकारचा सध्या कोणताही विचार नसल्याचा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

जरी केंद्र सरकारकडून ई-पास बंद करण्याचा निर्णय झाला असला, तरी राज्य शासनाचा पास बंद करण्याची भूमिका दिसत नाही. राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या रूग्णांचा विचार केल्यास अजून काहीकाळ ई-पास ठेवणं बंधनकारक असेल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

एसटी बसमधून प्रवास करणा-यांना ई-पासाची मुभा देण्यात आली आहे. परंतु खासगी प्रवासासाठी तुम्हाला ई-पासची आवश्यकता आहे. यामुळे सरकारवरती मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरूवारी अधिका-यांशी चर्चा केली. त्यामुळे यावर लवकरचं निर्णय होईल.

आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देताना सरकारने, ईपासची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी ई-पास बंधनकारक असेल, असे त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे खासगी वाहनांना वेगळा न्याय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News