'ही' पदवी मिळविणाऱ्या तरुणांना मिळू शकते 'या' परदेशी कंपनीमध्ये नोकरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020
  • मेडिकल क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना भारतात अनेक ड्रग्ज मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीमध्येअधिक मान्यता असते ज्यामध्ये बी फार्म, डी फार्म पदवीप्राप्त तरुणांना नोकरी मिळू शकते त्याचप्रमाणे परदेशातही अशा प्रकारच्या संधी उपलब्ध असतात.

मेडिकल क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना भारतात अनेक ड्रग्ज मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीमध्येअधिक मान्यता असते ज्यामध्ये बी फार्म, डी फार्म पदवीप्राप्त तरुणांना नोकरी मिळू शकते त्याचप्रमाणे परदेशातही अशा प्रकारच्या संधी उपलब्ध असतात.

फार्मास्यूटिकल सायन्स:

फार्मास्यूटिकल सायन्स हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास औषधे निर्मिती, औषधांची टेस्टिंग म्हणजेच एकप्रकारे मेडिकल क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळते. विदेशातील नावाजलेल्या ड्रग्ज मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्या, बायोटेक कंपन्या, अॅकेडमिक इंसिट्यूशन, सरकारी संस्था किंवा हॉस्पिटल नेहमीच या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या शोधात असतात. आयर्लंड, स्वीडन, सिंगापूर या देशांमध्ये फार्मास्यूटिकल सायन्स मधील अनुभवी व्यक्तींसाठी लाईफ चेंजिंग ऑपोर्च्यूनीटी उपलब्ध होऊ शकतात. या क्षेत्रामध्ये का करणाऱ्या व्यक्तीस वर्षाला ५२ ते ६६ लाखाचं सॅलरी पॅकेज मिळू शकतं

 बायोमेडिकल इंजिनियरिंग:

हा अभ्यासक्रम देखील हेल्थ आणि मेडिकल क्षेत्राशी निगडीत असला तरी यातील काम मात्र वेगळे असते. हेल्थकेयर मध्ये वापरात येणारे डिवाइज तयार करणे, त्यांच डिजाइन आणि रिसर्च करणे, तसेच मेडिकल उपकरणांची मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय, नेविगेशनल, मेजरिंग, इलेक्ट्रोमेडिकल आणि कंट्रोल इंस्ट्रूमेंट्सची मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या नोकऱ्या विदेशामध्ये या क्षेत्रामधील व्यक्तींना उपलब्ध होतात. या नोकऱ्यांसाठी कंपन्या वार्षिक ५६ लाख रुपयांचं सॅलरी पॅकेज ऑफर करू शकतात

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News