कोरोनाचे संकट असेपर्यंत मोहीम नाही

डॉ. शिवरत्न शेटे, दुर्गभ्रमंतीकार
Sunday, 7 June 2020
  •  जीवांशी खेळाल तर महाराज माफ करणार नाहीत !

कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारान जग हादरलंय, म्हणून यावर्षी 6 जून शिवराज्याभिषेक सारखा लोकोत्सव सुद्धा, रायगडावर न जाता, महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांनी घरातूनच छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली, दरवर्षीच आम्ही हिंदवी परिवारातर्फे पावसाळी पन्हाळगड, पावनखिंड आणि हिवाळी मोहीम असे आयोजन करीत असतो, असंख्य शिवभक्तांचे फोन/ मेसेज सुरू झाले की यावर्षी पावनखिंड मोहिमेचे काय? म्हटलं एक पोस्ट टाकून महाराष्ट्राला कळविणार!

खरं म्हणजे प्रत्येक शिवभक्ताला अतिशय जड अंतःकरणाने कळवावे लागतेय की कोरोना संकट असेपर्यंत मोहीम नाही, त्याचे कारण शारीरिक अंतर राखणे मोहीमेत कोणालाही शक्य होणार नाही, झोपताना एकाच खोलीत सर्व झोपतात, चालताना किंवा चढताना मास्क लावल्या... (हायपोऑक्सिया म्हणजे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे) होऊन मृत्यू होऊ शकतो, चालताना किंवा चढताना शरीराच्या पेशींची ऑक्सिजन डिमांड वाढलेली असताना कमी मिळाल्यास मृत्यू सुद्धा होऊ शकतो,

दुसरं एकच उदाहरण देतो, मोहिमेत सहभागी होण्यासाठी, एखादा शिवभक्त किंवा समूह, मुंबई, नागपूर, अमरावती, वाशीम, सोलापूर, परभणी बीड अशा ठिकाणाहून पन्हाळगडापर्यंत येतांना, ट्रॅव्हल्स/ ट्रेन तत्सम वाहनांतून येतांना, मास्क पासून precautionary measures कितीही पाळल्या, तरीही कोरोनाग्रस्त व्यक्तीकडून इन्फेकशन होऊ शकते,

₹4500/ रुपयांची private Lab द्वारे केली जाणारी कोरोना टेस्ट सर्वांना प्रॅक्टिकली शक्य होणार नाही, केवळ Thermal Gun द्वारे bodyt emperature हा एकमेव निकष गृहीत धरून मोहीम आयोजित करणे, ट्रेकर्सच्या जीवाशी खेळल्यासारखं होईल, कारण Asymptomatic corona patients (म्हणजे घसादुखी, ताप, खोकला, इत्यादी लक्षणे नसणाराही कोरोनाग्रस्त असू शकतो जो carrier असतो, आणि इतरांना त्या आजाराची लागण करू शकतो) बरेच रुग्ण आहेत. तरीही काही शिवभक्त मोहिमेबद्दल आग्रही असल्याचे त्यांच्या फोनवरच्या बोलण्यात दिसले, "म्हणत होते, की शिवाजी महाराजांची कृपा आपल्यावर आहे, मोहिमेत आजवर काहीच झालं नाही," अशा मानसिकतेच्या शिवभक्ताला एकच सांगू इच्छितो, आजवर प्रत्येक शिवभक्त हा मोहिमेत येताना वैयक्तिक जोखीम पत्करूनच येत असतो, अगदी सर्पदंश, चढाई करताना घसरणे, एखादा दगड निखळून डोक्यात पडणे इत्यादी. परंतु ही व्यक्तीगत जोखीम आजवर गृहीत धरून, शिवभक्त मोहिमेत सहभागी होत गेला, परंतु कोरोना हा विषाणू संसर्गजन्य असल्याने चुकून इन्फेकशन झाल्यास, घरच्या सदस्यांना आजाराची लागण होऊ शकते, म्हणून तुमच्या किल्लेभ्रमंती छंदामुळे घरच्यांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार कोणत्याही शिवभक्तांना नाही आणि ज्या छत्रपतीं शिवरायांसाठी करत आहात, त्यांना सुद्धा हे निश्चितच मान्य नसेल आणि शासनाने सुद्धा एकत्रित गर्दी करण्यावर कायदेशीर नियंत्रण घातलेच आहे, त्याचे पालन सर्वजण करू या!

हायकोर्टाने ट्रेकिंगचा समावेश साहसी खेळात केल्याने खूप अटी घालून दिल्यात. यातही कोणी आगळीक करेल आणि कोणाचा मृत्यू होईल तर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होतील. WHO या जागतिक आरोग्य संघटनेने, कोरोना नियंत्रणास 2022 कदाचित उजाडेल, या विषाणूने जगात धुमाकूळ घातलाय, कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की जग लॉकडाऊन होऊन ठप्प होईल, अजून तरी कोरोनावर प्रभावी औषध सापडलं नाही, आणि लस सुद्धा तयार झाली नाही, आणि सापडली तरीही त्याचे परिणाम, दुष्परिणाम काहीच ठाऊक नाहीत, आणि 130 कोटी लोकांना कशी शक्य होईल? आणि कोणताही व्हायरसचे समूळ उच्चाटन (complete eradication) लागलीच होत नसते, कित्येक दशकं लागतात. 

संसर्गजन्य नसणारा पोलिओ सारखा विषाणू जगातून नायनाट करायला जगाला अनेक दशकं लागलीत, कित्येक देशात राष्ट्रीय लसीकरण योजनेत, मोफत समावेश करावा लागलाय, शिवाय अमिताभ बच्चन सारख्या महानायकला 'दो बुंद जिंदगी के' म्हणत लोकांना प्रोत्साहित करावं लागतंय. आणि हो कोरोनावर नियंत्रण मिळवेपर्यंत चीन किंवा आपले शत्रूराष्ट्र  कोरोना सारखे अनेक प्रकारचे विषाणू , शत्रूराष्ट्राची अर्थव्यवस्था ठप्प करण्यासाठी Biological War म्हणून Launch करतील, म्हणून आपल्या सर्वांनाच स्वतःचे सरंक्षण करावे लागेल. 

कोरोना निमित्ताने शारीरिक अंतरापासून सॅनिटायझशनपर्यंत लागलेल्या चांगल्या सवयी पाळू या. याउपर तरीही काही स्वार्थी लोकं, पहिल्याप्रमाणेच ट्रेक आयोजित करतील किंवा काहीजण सहभागीही होतील तर अशा शिवभक्तांमुळे, परतल्यावर सर्व गावात कोरोना होईल आणि मोहिमेमुळे कोरोना गावात /शहरांत /कुटुंबात पसरला तर हा कलंक अप्रत्यक्ष पवित्र शिवमोहिमेवर लागेल.

तब्लिकी मरकजमुळे कोरोना प्रसारास हातभार लागला. तसा आरोप दुर्दैवाने कोणास करावयाची संधी देऊ नये. ऐसें जाहलियास रयतेची जीवापाड काळजी घेणारे महाराज कधीच माफ करणार नाहीत म्हणून पूर्ण कोरोना मुक्त होईपर्यंत आपण mass trekking थांबवू या ! आयुष्य मोठं आहे, सुरक्षितता निर्माण झाल्यावर पुनःश्च हरी ओम, पुन्हा किल्लेभ्रमंती (ट्रेकिंग)करू या !
शिवभक्ती आचरणाने करू या !
डॉ. शिवरत्न शेटे, दुर्गभ्रमंतीकार
9890 267026

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News