तरुणांनो लग्नापर्यंत सेक्स नको संयम पाळा; ब्राझील सरकारचं तरुणाईला आवाहन

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020
  • तरुणांनो लग्नापर्यंत संयम पाळा
  • ब्राझील सरकारचं तरुणाईला आवाहन

तरुणाईच्या सध्याच्या वागण्यावरून ब्राझील सरकार प्रचंड चिंतेत आहे..किमान लग्नापर्यंत धीर धरा, असं आवाहन करण्याची वेळ इथल्या प्रशासनावर आलीय. सरकारवर ही वेळ का आलीय, पाहुयात 

 ब्राझील सरकारनं सुरू केलेली आय चूज टू वेट ही मोहीम सध्या चांगलीच चर्चेत आलीय. या मोहिमेअंतर्गत सरकारकडून लग्नापर्यंत शरीरसंबंध ठेवू नका, संयम पाळा असं आवाहन तरुणाईला केलं जातंय.. ब्राझील मध्ये कुमारी माता आणि एचआयव्ही बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढतीय.
ब्राझील सरकारचे मानवाधिकार आणि कुटुंबकल्याण मंत्री डामारेस एल्वेस यांनी तरुणांना संयम ठेवण्यास सांगितलंय

आपल्या देशातील तरुण सामाजिक दबावाखाली शारीरिक संबंध ठेवतात. सेक्स शिवायदेखील तुम्ही पार्ट्यांचा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने उपभोगू शकता'. तरुणांना लग्नाआधी सेक्स करण्यापासून रोखण्यासाठी आय चूज टू वेट हे सरकारी अभियान तर सुरूच आहे शिवाय तरुणांचं मन वळवण्यासाठी चर्चच्या फादर्स सोबतही चर्चा केली जात आहे.  

अर्थात सरकारच्या या मोहिमेविरोधात इथं दोन गट तयार झालेत. डाव्यांनी या मोहिमेला विरोध केलाय. तरुणाईला लैंगिक भावनांवर संयम ठेवण्यासाठी जबरदस्ती करणं घातक ठरू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय सरकार लैंगिक आजार रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्यामुळे इथं विवाहपूर्वीच्या शरीर सबंधांवरून डावे आणि सत्ताधारी आमने सामने आलेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News