कंडक्टर ते सिनेसृष्टी व्हाया कॅबिनेट मंत्री! जाणून घ्या कोण आहेत हा प्रवासी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019
 • अभिनेता सुनील दत्त यांचा आज जन्मदिवस
 • कंडक्टर, यशस्वी अभिनेता ते लोकप्रिय राजकारणी असा होता जीवनाचा प्रवास...
 • सुनील दत्त यांना करावा लागला होता घर-दार गहाण ठेवण्याच्या परिस्थितीचा सामना...

एक उत्तम कलाकार, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून कायम आपल्या मनात जिवंत राहणारे अभिनेते सुनील दत्त यांचा आज (6 जून) सुनील दत्त यांचा जन्मदिवस आहे.

1955 ला 'रेल्वे प्लॅटफॉर्म' चित्रपटातून आपल्या करियरची सुरवात करण्याऱ्या सुनील दत्त उर्फ बलराज दत्त यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक खाचखळग्यांना तोंड दिले आहे. 'मदर इंडिया' चित्रपटाने दत्त यांना सुपरस्टार बनविले. 1964 ला दत्त यांना फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ अभिनेता तर 1968 ला त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तरीही सुनील दत्त यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटातील कथेला शोभावे असे राहीले आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे....

 • ​6 जून 1929 ला स्वातंत्र्यापूर्वी भारतात असलेल्या पाकिस्तानमधील झेलम येथे सुनील दत्त यांचा जन्म झाला. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगत असताना वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्यावरुन वडीलांचे छत्र हरपले. ते अठरा वर्षांचे असताना भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान उठलेल्या दंगलीतून याकूब नावाच्या मुस्लिम तरुणाने सुनील आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्राण वाचवले होते. फाळणीनंतर त्यांचे कुटूंब आधी यमुनानगर, पंजाब आणि नंतर लखनऊ येथे स्थायिक झाले. आई कुलवंती देवी यांनी त्यांचे पालनपोषण केले. उच्च शिक्षणासाठी सुनील दत्त हे मुंबईत आले.
 • मुंबईत शिक्षणासाठी जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी दत्त यांना पाच रुपये कमी पडत होते. ते भरून काढण्यासाठी त्यांनी मुंबई बेस्ट बसमध्ये कंडक्टरची नोकरीही केली.
 • महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर दत्त यांना एका जाहीरात कंपनीत नोकरी मिळाली. तेथूनच त्यांना रेडिओ जॉकी बनण्याचीही संधी आली.

 • ज्यानंतर काही वर्षातच त्यांना 1955 ला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. त्यानंतर मिळालेल्या 'मदर इंडिया' चित्रपटाने सुनील दत्त यांना सुपरस्टार तर बनविलेच पण चित्रपटातील को-स्टार नर्गिसच्या रुपाने त्यांना खऱ्या आयुष्यातील जोडीदारही मिळाला.

 • सुनील दत्त आणि मुलगा संजय दत्त यांच्यातील प्रेम सर्वश्रुत आहे. सुनील यांना आपल्या मुलाला 'रेशमा और शेरा' या महत्त्वकांक्षी चित्रपटातून लाँन्च करायचे होते. 1971 चा तो काळ होता. हा चित्रपट त्यांना स्वतः बनविण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटासोबत अनेक महत्त्ववूर्ण गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना पहिल्यांदाच एका चित्रपटात काम करणार होते. या चित्रपटात अभिनेता गोपाल बेदी यांचे नाव बदलून रंजीत करण्यात आले. त्यानंतर बॉलिवूडमध्ये रंजीत हे सर्वात मोठे यशस्वी करियर असलेले विलन बनले. हा पहिला चित्रपट होता ज्यात राखी आणि वहिदा रहिमान यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले. पण इतकं सगळं असूनही हा चित्रपट सपशेल आपटला आणि दत्त कुटूंबियाला प्रचंड आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. दत्त यांना आपल्या 7 पैकी 6 गाड्या विकाव्या लागल्या होत्या. घर गहाण ठेवावं लागलं होतं.
 • सुनील दत्त यांचे नर्गिस यांच्यावरील प्रेम त्यांनी अनेक मुलाखतीतून बोलून दाखविले आहे. दत्त कुठेही बाहेर गेले तरी नर्गिस यांच्यासाठी ते साडी घेऊन यायचे. पण नर्गिस यांनी त्यांनी दिलेली एकही साडी कधी नेसली नाही. कारण पतीने आणलेल्या साड्या त्यांना कधी आवडल्या नाहीत.
 • एका यशस्वी अभिनेत्याबरोबरच सुनील दत्त यांनी राजकारणातही आपली यशस्वी वाटचाल केली. 1984 ला काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर पश्चिम मुंबईतून ते निवडून आले. लगातार पाच वेळा ते खासदार राहीले. 2004 ते 2005 दरम्यान मनमोहनसिंह यांच्या काळात ते क्रिडा आणि युवा क्षेत्राचे कॅबिनेट मंत्रीही होते.

 • सुनील दत्त हे 2003 ला मुलगा संजय दत्तचा 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटात शेवटचे दिसले. त्यानंतर 2005 ला त्यांनी मुंबईतील राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News