स्मशानातील जळत्या निखाऱ्याला...

प्रतिक कांबळे,पवई
Saturday, 10 August 2019

ती राख अन् ते न जळालेली हाडे मला पाण्यात सोडायचे होते
प्रेताच्या आत्म्याला शांती लागावी म्हणून त्याच्या नावाचे कार्य करायचे होते            

स्मशानात सरणावर ठेवून अग्नी दिलेल्या प्रेतेची
पुर्णपणे राख झाली होती अन् सगळ खाक झाल होत
पण मी त्या राखेतून प्रेताची हाडे शोधण्यात मग्न होतो
कारण की... 

ती राख अन् ते न जळालेली हाडे मला पाण्यात सोडायचे होते
प्रेताच्या आत्म्याला शांती लागावी म्हणून त्याच्या नावाचे कार्य करायचे होते            
पण राखेतून हाडे शोधताना एक जळता निखारा लालभडक होताना दिसला

मग मीही त्या निखाऱ्याला राखेतून बाजूला काढून त्याला विचारले
सांग निखाऱ्या सांग मला या जळलेल्या प्रेताशी तुझ नात काय?
या जळलेल्या प्रेताशी तुझ गोत काय?

नुसताच लालसर व्हायचा, तर कधी मध्येच काळपट व्हायचा
कधी कधी लालसर पणा फिकट तर कधी भडकून आग फेकायचा
निखाऱ्या नुसता रंग बदलत होता म्हणून
त्याला मी त्याची जात देखील विचारली पण
निखाऱ्याने स्वतःची जात-पात पुर्णपणे लपवली

कारण...
त्याला ही माहिती होत की!
हा बुरसटलेला समाज आणि त्याची बिनबुडाची मानसिकता
जातीच्या नावाने चिखलफेक करायला ही मागेपुढे बघाणार नाही
त्या प्रेताचा विद्रोह मी माझ्या परीने मांडत होतो

प्रेताने किती दुख सोचले या समाजात तेही निखारा बनून सांगत होतो
पण हा बुरसटलेला समाज अन् बिनबुडाची मानसिकता मला काही सांगू मांडू देणार नाही 
पेटत्या निखाऱ्याला देखील शांत स्मशानात शांततेत पेटू देणार नाही

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News