'या' मारोती कारवर बंम्पर ऑफर; आता चक्क 2 लाखात मिळणार कार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020

सेकंड हॅन्ड कार खरेदी घेण्याचा ग्राहकांचा विचार असतील तर महिंद्रा फर्स्ट चॉइस, मारुती टू व्हॅल्यू, होंडाई अशा शोरूम मधून चांगल्या दर्जाची आणि कमी किमतीमध्ये मिळणार आहेत.

लॉकडाऊन काळात अनेक उद्योग व्यवसाय बंद झाले, त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आणि देशावर आर्थिक मंदीचे सावट पसरले. त्यामुळे ग्राहकांनी नवीन कार खरेदी करण्यात पाठ फिरवली. कमी किमतीमध्ये चांगली कंडीशन असलेली कार मिळत असल्यामुळे सेकंडहॅन्ड कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढू लागला. 

गाडी खरेदी केल्यानंतर ती नावावर करण्यासाठी ग्राहकांना अनेक वेळा आरटीओ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे गाडी आपल्या नावावर करण्यासाठी मारुती सुझुकी विशेष सोय करून दिली आहे. त्याचबरोबर सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्यासाठी मोठी ऑफर सुद्धा ग्राहकांना उपलब्ध करून दिली. सेकंड हॅन्ड कार खरेदी घेण्याचा ग्राहकांचा विचार असतील तर महिंद्रा फर्स्ट चॉइस, मारुती टू व्हॅल्यू, होंडाई अशा शोरूम मधून चांगल्या दर्जाची आणि कमी किमतीमध्ये मिळणार आहेत.

मारुती सुझुकीने सेकंड हॅड कार खरेदी करण्याची एक संधी ग्राहकांना उपलब्ध करून दिली. मारुती व्हॉगनआर ही कार केवळ 1 लाख 75 हजार रुपयांना मिळणार आहे, अशा मारुतीकडे 135 कार सध्या उपलब्ध आहेत. या कारवर एक वर्षांची वॉरंटी आणि तीन वर्ष फ्री सर्विसिंग देण्याचे आश्वासन मारुतीने दिले. त्याचबरोबर अल्टोची किंमत 1 लाख 50 हजार रुपये, सेलीरीओची किंमत 2 लाख 30 हजार आणि स्विफ्ट केवळ अडीच लाख रुपयांना मिळणार आहे. ही विशेष ऑफर मर्यादीत काळावधीसाठी असणार आहे.

गाडी विकत घेताना या गोष्टी तपासा 

  • कार सर्विस हिस्ट्री तपासा, ज्यामध्ये कारची संपूर्ण माहिती असेल
  • गाडी विकत घेताना इन्शुरन्स आणि गाडीचे कागदपत्र ग्राहकांच्या नावावर करता येतील का? याची तपासणी करा 
  • गाडी खरेदी करण्यापूर्वी मेकॅनिकला नक्की दाखवा 
  • गाडीचे बॉडी पार्ट, कलर, इंजिन, दरवाजे, हेडलाईट, काट यांची सविस्तर तपासणी करून घ्या 
  • गाडी खरेदी करताना आरसी मध्ये लिहिलेले तारीख आणि बोनटखाली मॅन्युफॅक्चरिंगची तारीख सारखीच आहे का याची खात्री करुन घ्या
  • दहा पंधरा किलोमीटर गाडीची टेस्ट ड्राईव्ह नक्की घ्या

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News