आनंदाचा बैलपोळा

वनिता मोडकेपाटील पवार 
Friday, 30 August 2019

शिंगांना बेगड बाशिंग डोक्याला
वेसन नवी अन् नवा कासरा
नैवेद्य गोड पुरणपोळीचा 
संगे गाई गुरे वासरा

सण आला आनंदाचा
माझ्या सर्जा राजाचा
ऋण त्यांच माझ्या भाळी
सण गावच्या मातीचा

आली श्रावणी अमावास्या 
संगे आनंदाचा बैलपोळा
कारभारीण ओवाळे आरती 
कपाळी लावूनी टिळा

झाली झाली खांदामळणी
नक्षीकामाची पाठीवर झूल
गेरूचे ठिपके सर्वांगी
गळ्यात घुंगूरमाळा डूल

शिंगांना बेगड बाशिंग डोक्याला
वेसन नवी अन् नवा कासरा
नैवेद्य गोड पुरणपोळीचा 
संगे गाई गुरे वासरा

सजवूनी सर्जा राजाला 
सारे राऊळात जमती
पोळा फुटतो तेव्हा 
कृतज्ञता व्यक्त करती

सण एक दिवसाचा
उर्जा देतो वर्षाची
बैलपोळा साक्ष देतो 
बळीराजाच्या हर्षाची

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News