मुंबई विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या परिपत्रकाला बुक्टू संघटनेचा विरोध

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020
  • कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याने शाळा महाविद्यालये प्रत्यक्षात सुरु होण्यास अजून काही कालावधी जाणार आहे.
  • परंतु शासनाने शाळा महाविद्यालयांचे वर्ग हे ऑनलाईन स्वरूपात भरवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई :- कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याने शाळा महाविद्यालये प्रत्यक्षात सुरु होण्यास अजून काही कालावधी जाणार आहे. परंतु शासनाने शाळा महाविद्यालयांचे वर्ग हे ऑनलाईन स्वरूपात भरवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ७ ऑगस्ट पासून मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या संलग्न महाविद्यालयांत ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठा अंतर्गत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील महाविद्यालये देखील येतात. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन लेक्चर अटेंड करण्यास अडचणी येतील अशा विद्यार्थ्यांनी व्हाट्सअँपद्वारे रेकॉर्डेड लेक्चर ऐकता यावे तसेच यूट्यूबवरून रेकॉर्डेड लेक्चर डाउनलोड करून घेता येतील अशी सुविधा उपलब्ध करण्यात येईल असे विद्यापीठाने जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हंटले. 

लॉकडाऊन काळात अनेक विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या मूळगावी स्थलांतर केले त्याचप्रकारे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नोकऱ्यांवरही याकाळात गदा आली. मुंबई विद्यापीठ हे फक्त मुंबई आणि ठाणे या परिसरांपुरते मर्यादित नसून त्यांच्या अख्यारीत कोकणातील अनेक जिल्हे येतात. रायगड तालुक्यात आलेल्या चक्रीवादळामुळे अनेक लोकांच्या घराची पडझड होऊन आर्थिक नुकसान झाले. अशापरिस्तिथीत ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन लेक्चर अटेंड करण्याकरीता लागणाऱ्या मोबाईल डेटा, इंटरनेट कनेक्शनसाठी पैसे कोठून आणणार असा सवाल बुक्टू म्हणजेच बॉम्बे युनिव्हर्सिटी कॉलेज टीचर्स युनियनने विद्यापीठाला विचारला आहे. 

सिनेट सदस्यांच्या झालेल्या बैठकीत विद्यापीठाने जाहीर केलेल्या परिपत्रकाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विद्यापीठाच्या या परिपत्रकाचा सर्व सिनेट सदस्यांनी विरोध केला. तसेच ज्या विद्यार्थ्यांनकडे संगणक, स्मार्ट फोन, इंटरनेट कनेक्शन नाही अशा विद्यार्थ्यांना यूट्यूब वरून तुम्ही ऑनलाईन लेक्चर डाऊनलोड करा असे सांगणे हास्यस्पद आहे असे बुक्टू चे सरचिटणीस प्रा. मधू परांजपे यांनी म्हंटले. बुक्टूच्या इतर सदस्यांनी मुंबई विद्यापीठ हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करत आहे असा आरोप केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News