महिलेच्या अंगावर पडली म्हैस; म्हशीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

थोड्या वेळातचं म्हैसीचा जागीचं मृत्यू झाला आणि महिला सुखरुप बचावली मात्र, या घटनेत महिला गंभीर जखमी झाली होती

करौली: दूध काढताना अचानकपणे म्हैस महिलेच्या अंगावर कोसळली. म्हैसीचे वजन जास्त असल्यामुळे म्हैसीखाली महिला आकडून पडली होती. थोड्या वेळातचं म्हैसीचा जागीचं मृत्यू झाला आणि महिला सुखरुप बचावली मात्र, या घटनेत महिला गंभीर जखमी झाली होती. ही खळबळ जनक घटना राज्यस्थान राज्यातील करौली जिल्ह्याच्या पैटोली गावात घडली.

गुरुवारी सकाळी दूध काढण्यासाठी महिला म्हैसीजवळ गेली होती, तेव्हा म्हैस ठिक होती. दूध काढण्यास महिलेने सुरुवात केली तेव्हा अचानकपण म्हैस महिलेच्या अंगावर कोसळली. काही मिनीचात म्हैसीने प्राण सोडला मात्र, म्हैसीखाली महिला आडकून बसली. म्हैसीचे वजन खुप असल्यामुळे तीला हटवणे आवघड काम होते. गावकऱ्यांनी मिळून म्हैसीला बाजूला केले आणि महिलेचा जीव वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले. 

बचावलेल्या महिलेचे नाव मोटी देवी आहे. या घटनेत मोटीदेवी गंभीर जखणी झाली होती, मोटीदेवीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या करौली जिल्हा रुग्णालयात मोटीदेवीवर उपचार सुरु आहेत. म्हैसीला चक्कर आल्यामुळे ती खाली कोसळली असावी असा अंदाज वशु वैद्यकीय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News