बजेटमध्ये तरूणांच्या तोंडाला 'अप्रेंटिशीप'ची पाने पुसली - रोहित पवार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 February 2020

सध्याचं सरकार संपताना देशात मंदीचे लाट येईल, त्याचबरोबर बेरोजगारी वाढेल आणि अराजकतेचं चित्र निर्माण होईल. केंद्र सरकारला ५ लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असल्याचे सांगण्याची वेळ येत असेल तर आपली बॅंकिंग व्यवस्था कोणत्या स्थितीतून जात आहे हे सुध्दा लक्षात येईल.

मुंबई - केंद्रीय अंर्थसंकल्प सादर केल्यापासून केंद्रसरकारवर विरोधक आणि जनतेकडून सोशल मीडियाच्या माध्यामातून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याच केल्याचे पाहायला मिळत आहे.  अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जरी इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये सवलत असल्याचे दाखवले असले, तरी तसं प्रत्यक्षात काहीचं होणार नाही. तरतूद केलेल्या सवलतीच्या प्रकारामुळे अनेक ठिकाणी इन्वेस्ट करून फायदा घेणा-यांना यापुढे तो मिळेल याची खात्री देता येत नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. 

निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये लहान गुंतवणूकदारांना नेमकं काय दिले याचा हिशोब केला, तर शुन्य सोडून काहीचं उरत नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. महत्त्वाच्या असलेल्या शिक्षण विभागात नोक-या निर्मिती करणे. विशेष म्हणजे सध्याच्या अर्थसंकल्पात बेरोजगारीवर भाष्य करण्यात आलेले नाही ही खरंतर लज्जास्पद गोष्ट आहे. भारतात मोठ्या प्रमाणात असलेल्या तरूणांच्या तोंडाला 'प्रशिक्षणाची' पाने पुसण्यात आली आहेत. तसेच शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सांगून हमीभावाबद्दल अवाक्षरही काढण्यात आलेलं नाही.  मुख्यत : आरोग्याच्या निधीमध्येही कपात करण्यात आली आहे. शेतीसाठी हे सरकार अनुकूल नसून त्याबाबत सकारात्मक योजना नसल्याचा आरोप रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. 

एलआयसीला सुध्दा केंद्रात असं सरकार आहे, माहित असतं तर त्यांनी सर्वांच्या आगोदर स्वत:ची पॉलिसी काढली असती. विरोधक अर्थसंकल्पावरती टीका करतात आणि सत्ताधारी त्याचं सर्मथन करतात हा प्रकार सामान्य माणूस म्हणून सवयीचा झाला आहे. खरंतर वर्ष संपताना आपल्या लक्षात येतं की, आपल्या खिशाला किती भूर्दंड पडला आहे. 
 

सध्याचं सरकार संपताना देशात मंदीचे लाट येईल, त्याचबरोबर बेरोजगारी वाढेल आणि अराजकतेचं चित्र निर्माण होईल. केंद्र सरकारला ५ लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असल्याचे सांगण्याची वेळ येत असेल तर आपली बॅंकिंग व्यवस्था कोणत्या स्थितीतून जात आहे हे सुध्दा लक्षात येईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News