"बुड बुड रे घागरी" या नाटकाची "गोमंत विद्या निकेतनच्या नाट्यस्पर्धेत बाजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

ही स्पर्धा १४ ते २२ जानेवारी  या कालावधीत निकेतनच्या बाबा कारे नाट्य सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

फातोर्डा  ः मडगावच्या गोमन्त विद्या निकेतनने आयोजित केलेल्या ३२व्या अखिल गोवा मराठी नाट्यस्पर्धेत फोंडा येथील अथश्री या संस्थेने सादर केलेल्या "बुड बुड रे घागरी" या नाटकाची प्रथम क्रमांकासाठी निवड झाली. त्यांना रोख बक्षिस व कै, वसंत गुडे फिरता चषक प्रदान करण्यात आला.

दुसऱ्या क्रमांकासाठी रसरंग उगवेच्या "दो बजनिए" या नाटकाला तर तिसरा क्रमांकासाठी नटरंग क्रिएशन्स नार्वे डिचोली यांनी सादर केलेल्या "आवरण" या नाटकाची तिसऱ्या क्रमांकासाठी निवड करण्यात आली. दो बजनिए या नाटकाला सर्वाधिक सात बक्षिसे मिळाली.

आज विद्या निकेतनच्या फॉमेंतो एम्फिथिएटरमध्य़े आयोजित बक्षिस वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर, कला विभागाचे प्रमुख आनंद मासुर, परिक्षक मंडळातील रामदास गुलवडी, अवधुत सहकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.कलाकाराने अभिनय करताना स्वताचा आत्मविश्र्वास जपावा. तसेच स्पर्धेसाठी रंगमंचावर जाण्यापूर्वी वर्षाकाठी कमीत कमी तीन वेळा तरी त्यापूर्वी प्रेक्षकांसमोर आपला अभिनय सादर करावा असे अवधूत सहकारी यांनी आपले विचार मांडताना सांगितले. 

ही स्पर्धा १४ ते २२ जानेवारी  या कालावधीत निकेतनच्या बाबा कारे नाट्य सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

नाटय स्पर्धेत वैयक्तिक बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे ः दिग्दर्शन - सुशांत नायक (बुड बुड रे घागरी, प्रथम), निलेश महाले (दो बजनिये, द्वितिय), संतोष शेटकर (आवरण, तृतिय). अभिनय - (पुरुष) गोपाळ भिंबर (बंटी, बुड बुड रे घागरी, प्रथम), मयुर मयेकर (कालिराम, राशोमन, द्वितिय).  (स्त्री)- ममता शिरोडकर (लक्ष्मी गौडा, आवरण, प्रथम), पद्मा भट (मायावती, चाफा, द्वितिय). नेपथ्य - सौमित्र बखले (दो बजनिए)
प्रकाश योजना - निलेश महाले (दो बजनिए). पार्श्र्वसंगीत - सर्वेश भोसले (बुड बुड रे घागरी). वेशभुषा - शनाया महाले (दो बजनिए).  रंगभुषा-  कृष्णनाथ खलप (चाफा). नाट्य लेखन - ज्ञानेश मोघे (राशोमोन, प्रथम), मिलिंद बर्वे (आवरण, द्वितिय), विजयकुमार नाईक (कोमल आणि तीव्र खिडक्या, तृतिय)
अभिनय उत्तेजनार्थ - (पुरूष कलाकार)- सौरभ कारखानीस (सिराज, दो बजनिए), सचिन चौगुले (ताज, दो बजनिए), मिलिंद बर्वे (नारायण शास्त्री, आवरण), अनंत खांडेकर (शेषशास्त्री, आवरण), सलिल नाईक (पुरूष, राशोमोन). (महिला कलाकार) - तन्वी दासेई जांभळे, प्रज्ञा कामत (अम्मू, कोमल आणि तीव्र खिडक्या), पुर्ती सावर्डेकर (अंजना, बॉईल्ड बीन्स ऑन टोस्ट), उर्वी रानडे (विमला,  बॉईल्ड बीन्स ऑन टोस्ट), स्नेहल गावकर शेटये.  बक्षिस वितरण समारंभा नंतर  अपरिचित पु.ल. हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News