विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाकरीता व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बीएसएनलचा नवा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020
  • कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याने १६ मार्च पासून देशातील सर्व शिक्षण संस्था बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला.
  • ४ महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आता परिस्तिथी हळूहळू रुळावर येत असली तरी ही देशभरातील शिक्षण संस्था अद्याप सुरु होण्याची चिन्ह दिसत नाहीत.

मुंबई :- कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याने १६ मार्च पासून देशातील सर्व शिक्षण संस्था बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. ४ महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आता परिस्तिथी हळूहळू रुळावर येत असली तरी ही देशभरातील शिक्षण संस्था अद्याप सुरु होण्याची चिन्ह दिसत नाहीत. तेव्हा सरकारच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबला गेला आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या व्यासपीठाचा त्यामध्ये वापर केला जात आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे अद्यावत इलेकट्रोनिक साधन नाहीत तसेच इंटरनेटसाठी पैसे खर्च करणे परवडणारे नाही अश्या विद्यार्थ्यांसाठी बीएसएनल एक नवा उपक्रम करू इच्छित आहे. 

ऑनलाईन शिक्षणासाठीचे व्यासपीठ विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध व्हावे यासाठी बीएसएनलने आयआयटी बॉम्बे आणि यप मास्टर्स यांना भागीदारीसाठी निवडले आहे. आयआयटी बॉम्बेच्या स्पोक स्पोकन ट्युटोरिअलमधून विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानातील साक्षरता, आरोग्य, पौष्टीक अन्न विविध विषयांवरील सामाजिक जागृती अशाप्रकारचा मजकूर उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच सध्या विविध शाळांकडून वापरल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म पैकी यप मास्टर्स हे अँप असून आता बीएसएनएल करू इच्छिणाऱ्या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून ऑनलाईन टेस्ट घेऊन त्यांची उत्तरे तपासणे, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, शिक्षकांसोबत लाईव्ह सेशन करणे यासाख्या सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती यप एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय रेड्डी यांनी दिली.

बीएसएनएलच्या उपक्रमाद्वारे देशातील प्रत्येक घटकांतील विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचण्याचे व्यासपीठ आम्हाला उपलब्ध होईल अशी प्रतिक्रिया प्राध्यापिका कनन यांनी दिली. कोरोना परिस्तिथीमुळे निर्माण झालेली ऑनलाईन शिक्षणाची गरज ओळखुन बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन उपक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. फायबर ब्रॉडबँड मधून आम्ही काही उपकरणे बाजारात आणली आहेत त्याचा उपयोग ग्राहकांना होत असल्याचे मत बीएसएनएलचे संचालक विवेक बन्झल यांनी व्यक्ते केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News